बॉलिवूड बादशाहला थेट बूर्ज खलिफावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त बूर्ज खलिफाला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. बूर्ज खलिफाच्या मालकाने ट्वीट करुनही शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या आहेत.
Shahrukh Khan Birthday: किंगखान अर्थात शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चा काल वाढदिवस झाला असून चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बूर्ज खलिफावरदेशील शाहरुखच्या आकर्षक रोषणाई करुन शुभेच्छा देण्यात आल्या. या फोटोसोबत शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेशदेखील लिहिले आहेत.
शाहरुखने काल 56 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शाहरुखचा चाहतावर्ग जगभरात आहे. त्यामुळेच दुबईतदेखील त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला गेला. दुबईतील बूर्ज खलिफामधील शाहरुखला शुभेच्छा दिलेला व्हिडीओ बूर्ज खलिफाच्या मालकाने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर शाहरुखचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Happy birthday @iamsrk from the @noon family
— Mohamed Alabbar محمد العبار (@mohamed_alabbar) November 2, 2021
كل عام وأنت بخير @iamsrk من عائلة نون pic.twitter.com/TIG3zURQjk
बूर्ज खलिफामधील व्हिडीओमध्ये शाहरुखच्या फोटोसह रोषणाई करण्यात आली आहे. तसेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेशदेखील लिहिला आहे. यात 'शाहरुख तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा', 'आम्हाला तु प्रचंड आवडतोस', 'आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो', असे प्रेमळ संदेश लिहिले आहेत. हा फोटो आणि संदेशामधला लाल रंगाचा हार्टची रोषणाईने उठून दिसत आहे. व्हिडीओमध्ये शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील 'तुझे देखा तो ये सनम सुना जा सकता है' या गाण्याचे पाश्वसंगीत देण्यात आले आहे.
Rajinikanth Film: रजनीकांतचा 'अन्नात्थे' भारतासह सातासमुद्रापार प्रदर्शित होणार
बूर्ज खलिफाच्या मालकाने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"नून कुटुबिंयांकडून शाहरुख खान तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा".