Happy Birthday Raj Babbar : ‘अर्पण’ ते ‘पूनम’, ‘या’ बॉलिवूड चित्रपटांमुळे राज बब्बर यांना मिळाली मनोरंजन क्षेत्रात ओळख!
Raj Babbar Birthday : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) आज 70वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Raj Babbar Birthday : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) आज 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. राज यांनी केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर राजकारणातही आपला ठसा उमटवला आहे. राज बब्बर यांचा जन्म 23 जून 1952 रोजी आग्रा, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांनी आग्रा येथील मुफिद-ए-आम इंटर कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज बाबर यांनी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
राज बब्बर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री केली. या अभिनेत्याने केवळ हिंदीच नाही, तर पंजाबी चित्रपटांमध्येही भरपूर काम केले आहे. 1977पासून ते पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. ‘मुकद्दर का फैसला’, ‘पूनम’ आणि ‘जिद्दी’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली. चाल जाणून घेऊया त्यांच्या अशाच काही चर्चित आणि गाजलेल्या चित्रपटांबद्दल...
इन्साफ का तराजू
1980 मध्ये बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'इन्साफ का तराजू' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा बॉलिवूड चित्रपट ‘लिपस्टिक’ या अमेरिकन चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात राज बब्बर मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत झीनत अमान, पद्मिनी कोहलापुरे आणि दीपक पराशर मुख्य भूमिकेत होते.
निकाह
24 सप्टेंबर 1982 रोजी प्रदर्शित झालेला 'निकाह' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. 'निकाह' चित्रपटातील एक संवाद, ‘अब के बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिलें, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें' हा आजही ऐकायला मिळतो. या चित्रपटात सलमा आगा आणि राज बब्बर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली.
आज की आवाज
दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'आज की आवाज' हा चित्रपट 7 सप्टेंबर 1984 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राज बब्बर, स्मिता पाटील आणि नाना पाटेकर एकत्र दिसले होते.
अर्पण
'अर्पण' हा चित्रपट 1 एप्रिल 1983 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला होता. राज बब्बर यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात रीना रॉयसोबत राज बब्बर, जितेंद्र आणि परवीन बॉबी मुख्य भूमिकेत झळकले होते.
पूनम
बॉलिवूडचा सदाबहार चित्रपट 'पूनम' 1981 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाण्यांना अनु मलिक, आशा भोसले, मोहम्मद रफी, भूपिंदर कौर आणि इतर गीतकारांनी आवाज दिला होता. या चित्रपटात राज बब्बर, पूनम ढिल्लन, शक्ती कपूर आणि कल्पना अय्यर मुख्य भूमिकेत दिसले होते.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Sonu Nigam : सोनू निगमच्या हस्ते रितू जोहरीचा 'द इमॉर्टल्स' अल्बम लाँच