एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार  यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. पण आता केतकीला जामीन मंजूर झाला आहे. 

मराठी सिनेसृष्टीचे महानायक अशोक सराफ येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ (Ashok Saraf) ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सहभागी होणार आहेत. 

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती; वरुण सुखराज करणार दिग्दर्शन

अलीकडच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठया प्रमाणावर होताना दिसतेय आणि रसिकप्रेक्षकही त्याला मनापासून दाद देताना दिसताहेत. अशाच वेळी महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मीतीची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव आहे... 'शाहू छत्रपती'. 

'भूल भुलैया 2' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. 

ज्यांचा कडक असेल डान्स त्यांना मिळेल चान्स; चिंचि चेटकीन शोधणार लिटिल मास्टर्स

‘डान्स महाराष्ट्र डान्स’हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी लवकरच 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कथाबाह्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी असणार आहे. 

'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात दिसणार सारा अली खान आणि जान्हवी कपूर

सिने निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात दिसणार आहेत. 7 जुलैला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'डॉक्टर स्ट्रेंज 2' डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज

मार्वल स्टुडिओचा बहुचर्चित 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा दुसरा भाग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 6 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. 

‘तमाशा लाईव्ह’ मधील ‘वाघ आला’गाणं रिलीज

सांगितिक नजाराणा घेऊन ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या 15 जुलैपासून प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत. चित्रपटातील एक जल्लोषमय गाणे झळकले आहे. त्या गाण्याचे बोल ‘वाघ आला’ असे असून या रॅप साँगमधून सचित पाटीलची ‘अश्विन’ ही भूमिका समोर येत आहे. त्याचा डॅशिंग लूक यात दिसत असून सचितने यात एका वृत्तनिवेदकाची भूमिका साकारली आहे. सचितची ही ओळख आपल्याला सिद्धार्थ जाधव करून देत आहे. या गाण्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाभला आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणे गायले असून क्षितीज पटवर्धन यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर संगीतकार अमितराज आहेत. 'वाघ आला' चे नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे. 

सिद्धार्थ जाधवचा घटस्फोट? पत्नीनं हटवलं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव, चर्चांना उधाण

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी निभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सिद्धार्थची पत्नी तृप्तीनं तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तिनं नावामधील जाधव हे अडनाव हटवल्यानं सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. 

'भूल भुलैया 2' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'चा रेकॉर्ड मोडणार? लवकरच पार करणार 200 कोटींचा टप्पा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 183.24 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
Prabhas Fauji: हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज
हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget