Happy Birthday Neha Kakkar : कधीकाळी भजनं गाऊन केला उदरनिर्वाह, आता आपल्या आवाजाने बॉलिवूड गाजवतेय नेहा कक्कर!
Neha Kakkar Birthday : आज नेहा तिच्या सुरेल आवाजामुळे लोकांच्या हृदयावर राज्य करत प्रसिद्ध गायिका बनली आहे. मात्र, हा प्रवास तिच्यासाठी कधीच सोपा नव्हता.
Neha Kakkar Birthday : बॉलिवूड विश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मोठी उंची गाठली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar). आज नेहा तिच्या सुरेल आवाजामुळे लोकांच्या हृदयावर राज्य करत प्रसिद्ध गायिका बनली आहे. मात्र, हा प्रवास तिच्यासाठी कधीच सोपा नव्हता. बालपणी ती आणि तिचे संपूर्ण कुटुंब जागरणामध्ये गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होते. आज (6 जून) नेहा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी...
वयाच्या चौथ्या वर्षी केली गायला सुरुवात
नेहा कक्करने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीपासूनच तिचे वडील आणि भावासोबत जागरणसारख्या धार्मिक कार्यक्रमात काम करायला सुरुवात केली. नेहा आणि तिचे संपूर्ण कुटुंब यात भजनं गायचे. यानंतर नेहा 2004 दरम्यान भाऊ टोनी कक्करसोबत मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिचा गायिका होण्यासाठीचा संघर्ष सुरु झाला. वयाच्या 18व्या वर्षी, नेहाने इंडियन आयडॉलच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशन दिली होती, मात्र या शोमध्ये ती फार काळ टिकू शकली नाही.
नेहा कक्करची बहीण सोनू कक्कर देखील एक गायिका आहे. तिचा भाऊ टोनी कक्कर हा गायक आणि संगीतकार आहे. नेहाचे तिच्या भावंडांसोबत खूप चांगले संबंध आहेत आणि ती त्यांच्याविषयी वेळोवेळी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. नेहा कक्कर आपल्या भावंड टोनी कक्कर आणि बहीण सोनू कक्कर यांच्यावर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही.
‘इंडियन आयडॉल सीझन 2’मध्ये झाली होती सहभागी
आपल्या आवाजाला एक नवीन ओळख देण्यासाठी नेहा कक्करने ‘इंडियन आयडॉल सीझन 2’मध्ये भाग घेतला होता. पण, सुरुवातीच्या काही भागांतच ती तिथून बाहेर पडली. ‘इंडियन आयडॉल’मध्ये ती विजेती ठरली नसली तरी, आता ती याच शोची जज म्हणून पुढे आली आहे. ‘इंडियन आयडॉल’नंतरही जवळपास पाच वर्षे नेहाला बॉलिवूडमध्ये कोणतेही काम मिळाले नव्हते.
‘या’मुळेही चर्चेत आली नेहा कक्कर
2019 मध्ये, नेहा 4.2 अब्ज व्ह्यूजसह YouTube वर सर्वाधिक पाहिलेल्या महिला कलाकारांच्या यादीत अग्रक्रमी होती. 2021मध्ये, ती YouTube डायमंड अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय गायिका ठरली. 2017 आणि 2019मध्ये ती ‘इंडिया फोर्ब्स सेलिब्रिटी 100’मध्येही झळकली होती. डिसेंबर 2020 मध्ये, फोर्ब्सच्या आशियातील 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत तिने स्थान पटकावले होते. नेहाने 2020 मध्ये गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केले. त्यांच्या लग्न चाहत्यांमध्ये आणि मीडियामध्ये खूप चर्चेचा विषय बनले होते.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Get Well Soon शाहरुख; ममता बॅनर्जींनी ट्वीट करत किंग खानसाठी केली प्रार्थना