एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Happy Birthday Mukesh Bhatt : थ्रिलर चित्रपटांच्या विश्वात गाजवलं नाव! मुकेश भट्ट यांचे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?

Mukesh Bhatt Birthday : मुकेश भट्ट बहुतेक यशस्वी चित्रपट हे थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री आहेत. त्यांच्या अशाच काही हिट थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...

Mukesh Bhatt Birthday : बॉलिवूड विश्वात थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) आज (5 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आयुष्यात अनेक संघर्षांना तोंड देत या टप्प्यावर पोहोचलेल्या मुकेश भट्ट यांना त्यांचे वडील नानाभाई भट्ट यांच्याकडून चित्रपट बनवण्याची आवड निर्माण झाली. नानाभाई भट्ट स्वत: दिग्दर्शक आणि निर्माते होते. मुकेश भट्ट यांनी 1990 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. 'जुर्म'  हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

भाऊ महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ या चित्रपटातून त्यांना पहिल्या यशाची चव चाखायला मिळाली. मुकेश भट्ट बहुतेक यशस्वी चित्रपट हे थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री आहेत. त्यांच्या अशाच काही हिट थ्रिलर चित्रपटांबद्दल जाणून घेऊया...

राज

‘राज’ हा 2002 चा विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि मुकेश भट्ट निर्मित हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपता ही जोडी त्यांचे अयशस्वी लग्न वाचवण्यासाठी उटीला जाते. तिथे त्यांना एका अनैसर्गिक शक्तीचा सामना करावा लागतो. मग, पत्नी संजना आपल्या पतीला भुताटकीच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी लढते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता.

गँगस्टर

‘गँगस्टर’ हा 2006 मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. यात इमरान हाश्मी, कंगना रनौत आणि शायनी आहुजा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे संगीत प्रीतमने दिले होते. हा चित्रपट गँगस्टर अबू सालेम आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या जीवनावर आधारित असल्याचे म्हटले जात होते. परंतु, चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनी या बाब नाकारली. कंगनाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि हा चित्रपट हिट ठरला.

सडक

‘सडक’ हा 1991चा महेश भट्ट दिग्दर्शित रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. संजय दत्त आणि पूजा भट्ट स्टारर 'सडक' हा 1991 सालातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सदाशिव अमरापूरकर यांच्या पुरस्कार विजेत्या अभिनयासाठीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहे.

मर्डर

‘मर्डर’ हा मुकेश भट्ट निर्मित आणि अनुराग बसू दिग्दर्शित 2004मध्ये प्रदर्शित झालेला थ्रिलर चित्रपट होता. बँकॉक, थायलंड येथे चित्रित झालेल्या या चित्रपटात इमरान हाश्मी, अश्मित पटेल आणि मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होते. मर्डर फ्रँचायझीमधील पहिला चित्रपट 2002च्या अमेरिकन चित्रपट ‘अनफेथफुल’वर आधारित होता. ‘मर्डर’ चित्रपट खूप यशस्वी झाला आणि त्याला भारतीय बॉक्स ऑफिस सुपरहिट चित्रपट म्हटले गेले.

जन्नत

‘जन्नत’ हा 2008मधील कुणाल देशमुख दिग्दर्शित रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट होता. यात इमरान हाश्मी आणि सोनल चौहान मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनाही आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiti Weather : रत्नागिरीत धुकेच धुके... सोबत कमालीचा गारठाDhananjay Chandrachud : संजय राऊतांच्या आरोपांवर चंद्रचूड यांचं उत्तरTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSpecial Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Embed widget