Happy Birthday Mahesh Bhatt : बॉलिवूडचे ‘कॉन्ट्रोव्हर्सी किंग’ महेश भट्ट! लग्नानंतरही अनेक अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाव
Mahesh Bhatt Birthday : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस आहे.
Mahesh Bhatt Birthday : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस आहे. महेश भट्ट यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांसोबतच ते इतरही अनेक कारणांमुळेही नेहमीच चर्चेत राहिले आहेत. महेश भट्ट यांचे नाव अनेकदा वादात देखील सापडले आहे. प्रोफेशनल लाईफ व्यतिरिक्त त्यांनी वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक हिट चित्रपट देऊनही ते चर्चेत राहिले ते मात्र वादांमुळेच..
महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट हे ब्राह्मण होते. तर, त्यांची आई शिरीन मोहम्मद अली या मुस्लिम होती. त्यामुळे देखील त्यांच्यावर टिकेची झोड उठताना दिसते. महेश भट्ट यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक वादांनी भरलेले आहे. दुसऱ्या लग्नासाठी महेश भट्ट यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता, यामुळेदेखील ते वादात अडकले होते.
कॉलेजमध्ये जमले प्रेम!
महेश भट्ट कॉलेजमध्ये असताना लॉरियन ब्राइट नावाच्या मुलीच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर लॉरियनचे नाव बदलून किरण भट्ट ठेवण्यात आले. किरण आणि महेश भट्ट या जोडीला पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी दोन मुले आहेत. दरम्यान, महेश भट्ट यांचे परवीन बॉबीसोबत देखील अफेअर होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला होता. त्यावेळी महेश भट्ट विवाहित होते. 1977मध्ये त्यांनी परवीन बाबीवरील प्रेम व्यक्त केले होते. विवाहित असूनही महेश भट्ट यांनी पत्नीला दूर करून परवीनसोबत लिव्ह इनमध्ये राहण्यास सुरुवात केली होती. मात्र, काही काळानंतर त्यांचे परवीनसोबतचे संबंधही बिघडले. याला कारण ठरला परवीन बाबी यांचा आजार.
परवीन बाबीसोबत अफेअर
महेश भट्ट आणि परवीन बाबी दोघेही एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते. पण, जेव्हा महेशला कळते की, परवीनला स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासले आहे, ज्यामध्ये तिला कोणीतरी आपल्याला मारतंय असा भ्रम निर्माण होतो, तेव्हापासून ते हळूहळू परवीनपासून वेगळे झाले. यानंतर दोघांचं नातं तुटलं आणि परवीन यांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या लग्नासाठी बदलाल धर्म
त्यानंतर महेश भट्टच्या आयुष्यात सोनी राजदान आल्या. सोनीसोबत अफेअर सुरु असताना महेश आणि त्यांची पहिली पत्नी किरण एकत्र राहत होते. त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट न घेता, सोनी राजदानशी लग्न केले. यासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना आलिया आणि शाहीन या दोन मुली आहेत.
‘हे’ वादही चर्चेत!
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसोबतच महेश भट्ट यांचेही नाव चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि रिया सोबत महेश भट्टसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर, लेक पूजा भट्ट हिच्यासोबत लीपलॉक केल्याचा फोटो एका मासिकावर झळकला होता. या प्रकरणामुळे महेश भट्ट यांना आजही ट्रोल केले जाते.
हेही वाचा :
Kangana Ranaut : 'महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम, लग्न करण्यासाठी बदलला धर्म'; कंगनाची पोस्ट चर्चेत