Mahesh Bhatt : ‘त्यांनी मला मारलं...माझ्यावर आरडाओरडा केला’, पाकिस्तानी अभिनेत्रीचे महेश भट्ट यांच्यावर आरोप!
Mahesh Bhatt : पाकिस्तानी अभिनेत्री मीराने (Meera) बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
Mahesh Bhatt : पाकिस्तानी अभिनेत्री मीराने (Meera) बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मीरा म्हणाली की, महेश भट्ट यांनी माझे शोषण केले आहे. ती म्हणाली की, मी एक अभिनेत्री आहे, मी पडद्यावर खूप बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले आहेत, त्यामुळेच मला असे सीन्स करण्यात कोणतीही अडचण येत नाही. याच गोष्टींचा फायदा घेण्यात आला. महेश भट्ट त्यांच्या चित्रपटांसोबतच अनेक वादांमुळेही चर्चेत असतात. त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. ज्यामध्ये भारतापासून पाकिस्तानपर्यंतच्या अभिनेत्रींची नावे सामील आहेत.
2005 मध्ये महेश भट्ट यांनी पाकिस्तानी अभिनेत्री मीराला त्यांच्या ‘नजर’ या चित्रपटात संधी दिली होती. त्यावेळी मीरा बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात मग्न होती. या अभिनेत्रीने महेश भट्ट यांच्यावर स्वतःचे शोषण केल्याचा आरोप होता. तसेच, महेश भट्ट यांच्यामुळेच त्यांना बॉलिवूड सोडावे लागले होते, असे म्हटले होते.
कोण आहे मीरा?
मीरा त्याकाळात स्ट्रगलिंग अभिनेत्री होती, त्यामुळे महेश भट्टसोबत काम करणे ही तिच्यासाठी मोठी गोष्ट होती. मीराचे खरे नाव इर्तिझा रुबाब होते. मीरा एक पाकिस्तानी चित्रपट अभिनेत्री, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि मॉडेल आहे. 1995 मध्ये तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. महेश भट्ट यांनी तिला पहिली संधी दिली होती. मीराचा ‘नजर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. मात्र, त्यानंतर बॉलिवूडमध्ये तिच्यासाठी जागा निर्माण झाली. महेश भट्टसोबत चित्रपट केल्यानंतर मीराने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मीराने सांगितले होते की, महेश भट्ट तिच्यावर दबाव टाकून तिला त्रास देत होते.
मीराने सांगितले की, महेश भट्ट यांना वाटायचे की, तिने इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत करू नये. त्यांच्यामुळेच मीराने बॉलिवूड सोडले आणि जेव्हा तिने परत येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी तिला परत येऊ दिले नाही.
म्हणून ते ओरडले आणि त्यांनी मारलं ही...
मीरा म्हणाली की, जेव्हा मी 'नजर' या चित्रपटातून माझ्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, तेव्हा मला राम गोपाल वर्मा, मणिरत्नम, सुभाष घई यांसारख्या अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांकडून ऑफर मिळाल्या, ज्यांना माझ्यासोबत काम करायचे होते. पण, महेश भट्ट यांना मी त्यांच्याशिवाय इतर कुणासोबत काम करावे असे वाटत नव्हते. एका रात्री मी सुभाष घईंना भेटले. ही गोष्ट मी महेशजींना सांगितल्यावर ते खूप संतापले, माझ्यावर ओरडले आणि दोन-तीन वेळा थप्पड मारली.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या