एक्स्प्लोर

Sarkaru Vaari Paata : सबस्क्रिप्शन असतानाही Amazonवर नाही पाहता येणार महेश बाबूचा ‘सरकारु वारी पाटा’, मोजावे लागणार पैसे!

Sarkaru Vaari Paata : 'सरकारू वारी पाटा' हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर ठरलेल्या वेळेच्या आधी अगोदर स्ट्रीम केला जात आहे. परंतु, आता सबस्क्रिप्शन असताना देखील ग्राहकांना हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार नाहीये.

Sarkaru Vaari Paata : साऊथ सुपरस्टार महेश बाबूचा (Mahesh Babu) 'सरकारू वारी पाटा'  (Sarkaru Vaari Paata) हा चित्रपट 12 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. टॉलिवूडमध्ये या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत 100.44 कोटींची कमाई केली होती. आता निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला आहे. याआधी हा चित्रपट Amazonच्या ग्राहकांना मोफत पाहता येणार होता. मात्र, चित्रपटगृहांच्या कमाईनंतर निर्मात्यांनी अॅमेझॉनवर कमाईचा नवा मार्ग शोधला आहे.

'सरकारू वारी पाटा' हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर ठरलेल्या वेळेच्या आधी अगोदर स्ट्रीम केला जात आहे. परंतु, आता सबस्क्रिप्शन असताना देखील ग्राहकांना हा चित्रपट विनामूल्य पाहता येणार नाहीये. अभिनेता महेश बाबूचा ‘सरकारु वारी पाटा’ हा चित्रपट Amazon Prime वर रेंटल स्कीममध्ये पाहू शकता. हा चित्रपट पाहण्यासाठी 199 रुपये मोजावे लागणार आहेत. एकदा रेंट दिल्यानंतर हा चित्रपट केवळ एकाच वेळ पाहता येईल.

महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांची जोडी

या चित्रपटाचा गल्ला वाढवण्यासाठी मेकर्सनी अॅमेझॉनच्या मदतीने ही योजना बनवली आहे. मात्र, जे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले नाहीत, ते अॅमेझॉनवर पैसे देऊन हा चित्रपट पाहतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर महेश बाबू आणि कीर्ती सुरेश पहिल्यांदाच यात एकत्र दिसले आहेत.

महेश बाबू आणि किर्ती सुरेश यांच्यासाठी हा चित्रपट खास आहे. महेश बाबूचा काही दिवसांपूर्वी ‘सरिलेरु नीकेवरु’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाने 260 कोटींचे वर्ल्ड वाईड कलेक्शन केले होते. 12 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. परशुराम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू एका बॅंक मॅनेजरच्या भूमिकेत आहे. चित्रपटातील महेश बाबू आणि कीर्ती सुरेश यांच्या रोमॅंटिक अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

1983 साली 'पोरातम' या चित्रपटातून बाल भूमिकेच्या माध्यमातून महेश बाबूने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1999 साली 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Phulwara First Look: 'पदर उठला'; 'फुलवरा' सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?
'पदर उठला'; 'फुलवरा' सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?
Chinmayee Sumeet: अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Embed widget