एक्स्प्लोर

Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...

Aishwarya Narkar Slams Troll: ऐश्वर्या नारकर यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टा हँडलवर शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत त्यांना ट्रोल केलंय.

Aishwarya Narkar Slams Troll: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) यांनी टीव्ही मालिकांपासून (TV Serials) ते मराठी चित्रपटांपर्यंतच्या (Marathi Movies) क्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आज जरी त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये दिसून येत नसल्या तरीसुद्धा सोशल मीडियावर मात्र त्या अत्यंत सक्रिय असतात. वयाच्या 50 व्या वर्षीही ही मराठमोळी अभिनेत्री आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. याच कारणामुळे त्या पन्नाशी ओलांडूनही त्या 25 वर्षांच्या तरुणीसारख्या दिसतात. अभिनयासोबतच त्या सोशल मीडियावरच्या त्यांच्या व्हिडीओंमुळेही चर्चेत असतात. यासोबतच ऐश्वर्या नारकर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. 

नुकतंच ऐश्वर्या नारकर यांनी योगसाधनेचा एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टा हँडलवर शेअर केला होता. या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं फारच विचित्र कमेंट केली. त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. 


Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...

नेमकं घडलं काय? 

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर योगसाधनेचा एक व्हिडीओ शेअर केलेला. अनेकांनी त्यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. पण काही महाभागांनी कमेंट करुन ऐश्वर्या नारकर यांना ट्रोल केलं. एकानं कमेंट करत लिहिलं की, "निदान कॅमेरासमोर तरी फूल कपडे घालून योगा करत जा मॅडम..." 

ऐश्वर्या नारकर यांनी युजरची ही कमेंट शेअर केली आहे. तसेच, ती कमेंट शेअर करुन उत्तर दिलं आहे की, "बुरसटलेले विचार सोडा, तुमचा फोकस का हलतोय?" यावर त्या युजरनं ऐश्वर्या नारकर यांना पर्सनलवर मेसेज केला आणि सांगितलं की, "याला तुम्ही बुरसटलेले विचार म्हणत असाल तर तुमच्या अकलेची कीव करावीशी वाटते, व्हिडीओला views वाढवण्यासाठी असे कपडे घालून व्हिडीओ बनवता?" यावरुन मात्र ऐश्वर्या नारकर चांगल्याच संतापल्या. आता मात्र, त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. 

Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...

Aishwarya Narkar Slams Troll: 'निदान कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा मॅडम...'; युजरची कमेंट पाहून ऐश्वर्या नारकर भडकल्या, सडेतोड उत्तर देत म्हणाल्या...

"तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात त्याचं काय करायचं?"

ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर दिलं की, "मुद्दा वयोमानाचा आहे. कोणी काय कपडे घालावेत, हा व्यक्तीगत प्रश्न आहे. तुमच्या स्टेटमेंटवरुन अक्कल कळतेच आहे..." ऐश्वर्या नारकरांच्या या कमेंटवर त्या युजरनं पुन्हा उत्तर दिलं. तो म्हणाला की, "कोणते कपडे घालायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात त्याचं काय करायचं?" आता मात्र, ऐश्वर्या नारकर यांनी थेट उत्तर देऊनच टाकलं. त्यांनी सांगितलं की, "त्यांना व्यायाम करायला शिकवा. म्हणजे विचारांचा समतोल येईल आणि डोकं शाबुत राहिल. नाहीतर तुमच्यासारखंच होणार मोठे होऊन..." यावर मात्र, त्या युजरनं शांत बसणंच योग्य समजलं. त्यानंतर त्यानं कोणताही मेसेज केलेला नाही. 

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांना आलेला हा अनुभव काही पहिला नाही. यापूर्वीही त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावेळीही ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर देऊन सर्वांची बोलती बंद केलेली. अनेकदा ऐश्वर्या नारकर त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांच्यासोबत डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. त्यावेळीही दोघांना मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Lock Upp: 52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...
52 वर्षांच्या राम कपूरने 22 वर्षांनी लहान असलेल्या श्रेया कालरासोबत नको ते केलं; व्हिडीओने सर्व समोर आलं, आता पत्नीने सर्वांसमोर मागितली माफी, म्हणाली...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget