एक्स्प्लोर

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?

Badshah in Legal Trouble: रॅपर बादशाह एका गाण्यामुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

FIR filed against Badshah over Haryanvi song: रॅपर बादशाहच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी. गायकाच्या अडचणीत वाढ होणार आहे. 'टटीरी' या हरियाणवी गाण्याबाबत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. हरियाणा राज्य महिला आयोगाने या संदर्भात पोलिसांकडे धाव घेतली आहे. तसेच पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जर बादशाहने तपासात सहकार्य  केले नाही तर, त्याच्यावर अटकेची कारवाई करावी. तसेच आवश्यक असल्यास बादशाहचा पासपोर्ट जप्त करावा. अन्यथा तो या प्रकरणातून परदेशात जाऊन पळ काढू शकतो.  हरियाणा राज्य महिला आयोगाने बादशाह यांना या प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले होते. 

खरंतर, या प्रकरणात बादशाहला चौकशीसाठी 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पानिपत येथील आयोगासमोर हजर राहण्यास सांगितले होते.  दरम्यान, सांगितलेल्या वेळेपर्यंत न पोहोचल्याने आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी बादशाहवर पोलिसांना कठोर  कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 'पानीपत आणि पंचकुला पोलिसांनी बादशाहवर  तात्काळ कारवाई करावी आणि गरज पडल्यास त्याला अटक करावी', अशी मागणी केली आहे. 

यासह संपूर्ण राज्याला सूचना जारी केले की, जोपर्यंत बादशाह  आयोगासमोर हजर होत नाही, तोपर्यंत बादशाहच्या कोणत्याही संगीत कार्यक्रमांना हरियाणात  परवानगी दिली जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं. आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, 'पोलीस तपासादरम्यान बादशाह परदेशात जाऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करु शकतो.  अशावेळी पोलीस त्याचा पासपोर्ट देखील जप्त करु शकतात. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी', असंही पोलिसांनी स्पष्ट  केलं. 

बादशाहच्या वकिलांनी माध्यमांसमोर सांगितलं की,  महिला आयोगानं बादशाहला वेळ दिला आहे. दरम्यान, बादशाहने आधीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये त्याने जनतेची आधीच माफी मागितली होती.  तसेच कुणाच्याही भावना दुखावण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता असे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार,  हा वाद तेव्हा सुरु झाला, जेव्हा हरियाणा पोलिसांनी बादशाहविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by BADSHAH (@badboyshah)

पोलिसांच्या म्हणणयानुसार, गाण्याच्या व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातील मुली हरियाणातील रोडवेजमधील बसमध्ये नाचताना आणि आक्षेपार्ह वाटणारे हावभाव  आणि शब्द वापरताना दाखवण्यात आले आहेत.  या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बादशाहविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याविरुद्ध लूकआउट  नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...
'अभिषेक बच्चननं जे केलं, ते अमिताभ यांनाही जमलं नाही...'; KBC कंटेस्टंटचा मोठा दावा, 'बिग बी'सुद्धा अवाक्...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget