एक्स्प्लोर

Happy Birthday Kajal Aggarwal : कधी काळी बॅकग्राउंड डान्सर म्हणून केलं काम, आता साऊथसह बॉलिवूड गाजवतेय काजल अग्रवाल!

Kajal Aggarwal Birthday : अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली.

Kajal Aggarwal Birthday : साऊथपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आज (19 जून) आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूड चित्रपटातून केली होती. मात्र, साऊथ इंडस्ट्रीने तिला खरी ओळख मिळवून दिली. साऊथमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री काजल अग्रवालने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक केले आणि बॉलिवूडविश्वही गाजवले.

काजल अग्रवालचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. अभिनेत्रीने मास मीडिया विषयामध्ये पदवी मिळवली आहे. काजलला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. यामुळे तिने ‘बॅकग्राउंड डान्सर’ म्हणून करिअरला सुरुवात केली होती.

ऐश्वर्या रायसोबत केली करिअरची सुरुवात!

काजल अग्रवालने 2004 मध्ये ‘क्यूं हो गया ना’ या बॉलिवूड चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात काजलने ऐश्वर्या रायच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर काजल तमिळ दिग्दर्शक भारतीराजाच्या ‘बोमलट्टम’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन सर्जा आणि नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

साऊथकडे वळवला मोर्चा!

बॉलिवूडमध्ये फारशी ओळख मिळत नसल्याचे पाहून काजलने तामिळ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. तिने 2007मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’मध्ये अभिनेता कल्याण रामसोबत तेलगूमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी जादू शकला नाही. त्यानंतर ती त्याचवर्षी ‘चंदामामा’मध्ये दिसली. हा चित्रपट काजलचा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला होता. यानंतर, 2009 मध्ये रिलीज झालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘मगधीरा’ या ऐतिहासिक चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली. या चित्रपटामुळे संपूर्ण इंडस्ट्रीने काजलच्या अभिनयाची दाखल घेतली.

बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन!

साऊथमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर काजलने 2011मध्ये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. तिला अजय देवगणसोबत ‘सिंघम’ चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’ चित्रपटामध्ये काजल अग्रवाल आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. यानंतर, काजल ‘स्पेशल 26’, ‘दो लफ्जों की कहानी’, ‘मुंबई सागा’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे. अभिनेत्री काजळ अग्रवालने व्यावसायिक गौतम किचलू याच्याशी लग्नगाठ बांधली असून, ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

हेही वाचा :

Kajal Aggarwal : मातृदिनी सिंघम गर्ल काजल अग्रवालने शेअर केली मुलाची पहिली झलक, पोस्ट चर्चेत

Kajal Aggarwal Baby Boy : सिंघम गर्ल काजल अग्रवालने दिला एका मुलाला जन्म!

PHOTO : काजल अग्रवालचं नवं फोटोशूट, व्हाईट ड्रेसमध्ये सौंदर्य खुललं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget