(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kajal Aggarwal : मातृदिनी सिंघम गर्ल काजल अग्रवालने शेअर केली मुलाची पहिली झलक, पोस्ट चर्चेत
Kajal Aggarwal : अभिनेत्री काजल अग्रवालसाठी यंदाचा मातृदिन खास आहे.
Kajal Aggarwal : आज जगभरात मातृदिन साजरा केला जात आहे. मातृदिनानिमित्त दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने (Kajal Aggarwal) तिच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. काजलच्या मुलाचे नाव नील असे आहे. मुलासोबतचा फोटो शेअर करत काजलने एक खास पोस्टदेखील लिहिली आहे.
काजलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिले आहे, नील माझ्यासाठी खूप खास आहेस आणि नेहमीच राहील. जेव्हा नीलचा छोटासा हात हातात घेतला तेव्हा एक वेगळाच अनुभव आला. नील माझा पहिला मुलगा आहे. येत्या दिवसांत मी नीलला अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण त्याआधीच नीलने मला खूप गोष्टी शिकवल्या आहेत.
View this post on Instagram
काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी 19 एप्रिल रोजी पहिल्या मुलाचे स्वागत केले. काजल अग्रवाल आणि गौतम किचलू 30 ऑक्टोबर 2020 रोजी लग्नबंधनात अडकले होते. काजल अग्रवाल आणि गौतम किचलूचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत असतात. मातृदिनी काजलने शेअर केलेल्या फोटोवर अनेक सेलिब्रिटी कमेंट्स करत आहेत.
संबंधित बातम्या