Amol Kolhe : पुष्पाची क्रेझ, यह टायर तो फायर निकला... डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केला वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ
Amol Kolhe : राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Amol Kolhe : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॉटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला. 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी 'पुष्पा'ची क्रेझ कायम आहे. अनेक सेलिब्रिटींनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग्सवर व्हिडीओ तयार केले आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी नुकताच एक वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते टायरसोबत वर्कआऊट करताना दिसत आहेत. त्यांच्या व्हिडीओ आणि कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमोल कोल्हेंनी व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, "यह टायर तो फायर निकला... लेकिन मैं थकेगा नहीं साला... लहानपणी धुळीच्या रस्त्यांवर जुन्या टायरला एका हातातील काठीने बडवत दुसऱ्या हाताने कमरेवरून घरंगळणारी चड्डी सावरताना वाटलं नव्हतं की टायर असा घाम काढेल."
View this post on Instagram
डॉ. अमोल कोल्हेंचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ आणि हटके कॅप्शन नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. 'फायर है बॉस!, शेर की झलक सबसे अलग, सर, तुम्ही रॉकस्टार आहात, अशा कॅप्शन देत डॉ. अमोल कोल्हेंचे चाहते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या
Sarkha Kahitari Hotay : ‘सारखं काहीतरी होतंय!’, 36 वर्षांनी एकत्र दिसणार प्रशांत दामले-वर्षा उसगांवकरांची जोडी
Sana Khan : दुबई भ्रमंतीत सना खानने घेतला 24 कॅरेट चहाचा आस्वाद! बुर्ज खलीफाच्या 'या' चहाची किंमत ऐकलीत?
Swaralata : ‘स्वरलता... तुला दंडवत’ , गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांगीतिक मानवंदना!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha