(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gehana Vasisth: फैजान अन्सारीसोबतच्या लग्नाच्या चर्चेवर गेहना वशिष्ठनं सोडलं मौन; सांगितलं व्हायरल फोटोमागील सत्य
गेहना (Gehana Vasisth) आणि फैजान यांचे लग्न झाले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
Gehana Vasisth: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल फोटोमध्ये गेहनासोबत फैजान अन्सारी (Faizan Ansari) देखील दिसत होता आणि दोघांच्या गळ्यात फुलांचा हार दिसत होता. त्या फोटोमुळे गेहना आणि फैजान यांचे लग्न झाले असून गेहनानं इस्लाम धर्म स्वीकारला आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. आता या सर्व प्रकरणावर गेहनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
गेहना वशिष्ठची पोस्ट
‘बहनें’ आणि 'गंदी बात' यांसारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी लग्न केलेलं नाही. तो फोटो वेब सीरिजच्या शूटमधील होता'
पुढे गेहनानं पोस्टमध्ये लिहिलं, 'मी गेहना वसिष्ठ, हे स्पष्ट करते की, मी कधीही कोणाशीही लग्न केले नाही आणि ते फक्त वेबसीरिजचं शूट होते. बाकी काही नाही मी फैजानलाही ओळखत नाही. वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान आणि माझ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मी त्याला भेटले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला त्याचे पूर्ण नाव देखील माहित नाही. मी खूप वर्षांपासून माझ्या बॉयफ्रेंडला डेट करत आहे आणि त्याचे नाव राम आहे. त्यामुळे इतर कोणाशीही आणि विशेषत: ज्यांना मी ओळखतही नाही अशा कोणाशीही मी लग्न करणार नाही.' गेहनाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
गेहना आणि फैजानच्या सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमध्ये दिसले की, गेहानाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर फैजानने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.
कोण आहे गेहना वशिष्ठ?
गेहना (Gehana Vasisth) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. इन्स्टाग्रामवर गेहनाला 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.गेहनाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. गेहना वशिष्ठ ही आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Gehana Vasisth Marriage: 'गंदी बात' फेम गेहना वशिष्ठचा निकाह संपन्न? फैजान अन्सारीसोबत केलं लग्न?