Gehana Vasisth Marriage: 'गंदी बात' फेम गेहना वशिष्ठचा निकाह संपन्न! फैजान अन्सारीसोबत केलं लग्न
अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिने फैजान अन्सारीसोबत लग्न केले आहे.
Gehana Vasisth Marriage: ‘बहनें’ आणि 'गंदी बात' यांसारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिने लग्न केले आहे. गेहनाने अभिनेता-बॉयफ्रेंड फैजान अन्सारीसोबत लग्न केले असून तिने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. फैजान आणि गेहना या नवविवाहित जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेहनाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.फोटोमध्ये दिसत आहे की, गेहानाने तिच्या लग्नात लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर तिचा नवरा फैजानने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. एका रिपोर्टनुसार, गेहनाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, गेहना आणि फैजान एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचे नाते "शुद्ध" आहे. गेहानाने लग्नासाठी धर्मांतर केले नव्हते, परंतु ती "तिची स्वतःची वैयक्तिक निवड" होती.
गेहना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. इन्स्टाग्रामवर गेहनाला 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
कोण आहे गेहनाचा पती फैजान अन्सारी?
गेहनाचा पती फैजान अन्सारी हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे आणि तो Amazon MiniTv रिअॅलिटी शो डेटबाजीमध्ये देखील दिसला होता. गेहना वशिष्ठ ही एक अभिनेत्री-मॉडेल असून तिने हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram
गेहनावरती 2021 मध्ये पॉर्न व्हिडीओ तयार करणे आणि वेबसाईटवर ते अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे ती चर्चेत होती. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने तिला अटक केली होती. त्यानंतर तिची जामीनावर सुटका झाली होती. गेहना ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.
गेहनानं मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे. गेहना वशिष्ठने आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Snehal Rai : 'इश्क का रंग सफेद' मालिकेतील अभिनेत्रीचा पुण्यात अपघात; थोडक्यात बचावली स्नेहल राय