एक्स्प्लोर
Advertisement
पप्पांना कधीच खोलीत बंद केलं नव्हतं: गीता फोगाट
नवी दिल्ली: 'पप्पांना कधीच खोलीत बंद केलं नव्हतं, चित्रपट रंजक व्हावा यासाठी असं करण्यात आलं होतं.' असं उत्तर खुद्द कुस्तीपटू गीता फोगाटनं दिलं आहे.
'दंगल' हा सिनेमा हरियाणाच्या पैलवान गीता आणि बबिता फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर यातील एका दृश्यावर बराच वाद झाला. सिनेमात कोचची बरीच नकारात्मक भूमिका दाखविण्यात आली आहे. त्यामुळे गीताचे खरे प्रशिक्षक प्यारा राम हे खूपच नाराज होते. त्यामुळे त्यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं.
सध्या गीता दिल्लीतील बवानामध्ये नांगल ठाकरान यांच्या राकेश पैलवान आखाड्यात सराव करते. राकेश पैलवान यांचा छोटा भाऊ पवनसोबत याचवर्षी 20 नोव्हेंबरला गीताचं लग्न झालं. गीताचा पतीही एक पैलवान आहे.
दरम्यान, या सिनेमाबाबत बोलताना गीता फोगाट म्हणाली की, 'काही बातम्यांमधून मला समजलं की, ते कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहेत. पण ते जे आरोप करीत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की, सिनेमात कुणाचंही नाव घेण्यात आलेलं नाही. तसंच सिनेमा रंजक व्हावा यासाठी काही गोष्टीचा त्यात समावेश करण्यात आला आहे.'
'सिनेमा रंजक व्हावा यासाठी असं करण्यात आलं आहे. तसंच हे अजिबात खरं नाही की, वडिलांना खोलीत डांबलं होतं. पण ही गोष्ट खरी आहे की, वडिलांना रेसिलंग एरियात प्रवेश करु दिला नव्हता. कारण की, तिथं फक्त खेळाडू आणि प्रशिक्षक राहतात. पण वडिलांची इच्छा होती की, आमच्यासोबत राहावं.' असंही गीता म्हणाली.
'आम्हाला वाटतं की, जेव्हा पप्पासोबत असतात तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करतो. जर ते प्रेक्षकांमध्ये बसले तर आमच्यापर्यंत त्यांचा आवाज येत नाही.' असं गीतानं उत्तर दिलं.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत
Advertisement