(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil : "माझा कारभार सोपा नसतोय रं"; गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणाले...
Gautami Patil : गौतमी पाटीलचं "माझा कारभार सोपा नसतोय रं" हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Gautami Patil New Song Maza Karbhar Sopa Nastoy : 'सबसे कातील गौतमी पाटील' (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या नृत्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या गौतमीचं आता नवं गाणं (Gautami Patil New Song) आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'माझा कारभार सोपा नसतोय रं' (Maza Karbhar Sopa Nastoy) असं या गाण्याचं नाव आहे. सोशल मीडियावर (Social Media) या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'माझा कारभार सोपा नसतोय रं' या गाण्याचा व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलचा नखरेल अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या नखरेल अदा आणि बोल्ड लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शॉर्ट स्कर्ट, चोळी, केसात गजरा, कपाळावर टिकली असा काहीसा गौतमीचा लूक आहे. या गाण्यात तिच्या हातात दारुच्या बाटल्या दिसत आहेत. गौतमीच्या नखरेल अदांनी प्रेक्षकांना चांगलच वेड लावलं आहे.
गौतमीचं नवं गाणं सोशल मीडियावर व्हायरल
गौतमी पाटीलचं 'माझा कारभार सोपा नसतोय रं' हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच या गाण्याला 53 हजारापेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गौतमीच्या या व्हिडीओवर "गौतमीचा कारभार सोपा नसतोय रं", खूप छान, जबरदस्त गाणं, लय भारी अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. गौतमीचं गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं असून चाहते कमेंट्स करत तिचं कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
गौतमी पाटीलने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना नव्या गाण्याची आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणाली,"नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी गौतमी पाटील. आज माझं नवं गाणं तुमच्या भेटीला आलं आहे. "माझा कारभार सोप्पा नसतोय रं", असं या गाण्याचं नाव आहे. रेक्स स्टुडिओच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रेक्षक पाहू शकतात. रत्नदिप कांबळे यांनी निर्मिती केली आहे. सर्वांनी आवर्जून हे गाणं पाहावं. या गाण्यात माझा नवा अंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे. सर्व प्रेक्षकांनी आणि महिलावर्गाने हे गाणं आवर्जुन पाहा. माझ्यावरचं तुमचं प्रेम असचं कायम राहुद्या. माझ्या गाण्यावरदेखील प्रेम करा..धन्यवाद".
जेवढी साधी भोळी त्याच्या दुप्पट तिखट आहे मी : गौतमी पाटील
गौतमीने गाण्याचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"जेवढी साधी भोळी त्याच्या दुप्पट तिखट आहे. सादर करीत आहोत सबसे कातील गौतमी पाटील यांचा अनोखा अंदाज...'माझा कारभार सोपा नसतोय रं". गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे नृत्य, अंगविक्षेप हावभाव याकडे अनेकदा तिला ट्रोल करण्यात येते. गौतमीचा 'घुंगरू' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या