एक्स्प्लोर

Gadad Andhar Teaser: पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'; टीझर प्रदर्शित

'गडद अंधार' (Gadad Andhar) या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Gadad Andhar Teaser: पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे आॅफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा 'गडद अंधार' चा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'गडद अंधार' या अनोख्या टायटलमुळे चर्चेत असलेल्या या थ्रिलरपटाचा टिझरही अतिशय रोमांचक आहे. पाण्यात उडी मारण्यापूर्वी बोटीत असलेला नायक-नायिका, समुद्राच्या तळाशी अंधाऱ्या गुहेत जाण्याचा त्यांचा प्रयत्न, पाण्याखालचं मनमोहक दृश्ये टिपणारा कॅमेऱ्याची जादू 'गडद अंधार'च्या टिझरमध्ये पहायला मिळते. खऱ्या अर्थाने रोमांचक चित्रपटाची झलक दाखवणारा असा हा टिझर आहे. आजवर कधीही न पाहिलेलं कथानक आणि अलौकीक विश्वावर 'गडद अंधार' हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे. थरार आणि भय यांचा संगम घडवणारा टिझर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. 'गडद अंधार' हा चित्रपट मराठी रसिकांना खऱ्या अर्थानं एक वेगळा अनुभव देणारा असल्याचं सांगत दिग्दर्शक प्रज्ञेश कदम म्हणाले की, या चित्रपटाचा टिझर खऱ्या अर्थानं चित्रपटाची झलक दाखवणारा आहे. याद्वारे रसिकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाताना 'गडद अंधार'च्या टिमला खूप आनंद होत आहे. 'गडद अंधार' या टायटलमधील अंधारात प्रेक्षकांना कोणता प्रकाशकिरण दिसणार आणि त्यातून कथानकातील कोणते पैलू उलगडणार हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेतले असल्याचंही प्रज्ञेश म्हणाले.

View this post on Instagram
 
A post shared by J A Y D U D H A N E (@jaydudhaneofficial)

'एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स 3'चा विजेता तसंच 'बिग बॅास' फेम जय दुधाणे, नेहा महाजन, शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांनीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं असून, पार्श्वगायक व संगीतकार रोहित राऊतनं 'गडद अंधार'मधील गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली आहे. सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Best Of 2022 : अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केली वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची यादी; जाणून घ्या कोणती गाणी ठरली बेस्ट...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
सोशल मीडियावर फोटो व्हिडीओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार, बीडच्या एसपींचा इशारा 
'...त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणार' बीडचे SP नवनीत कॉवत यांची माहिती, दहशत माजवणाऱ्यांना इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्यSiddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?Bachchu Kadu Full PC : कोर्ट बदमाश,न्याय देईल असं वाटत नाही;बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
सोशल मीडियावर फोटो व्हिडीओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार, बीडच्या एसपींचा इशारा 
'...त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणार' बीडचे SP नवनीत कॉवत यांची माहिती, दहशत माजवणाऱ्यांना इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलंय, पण मला तिथं 60 मतं; कोर्ट बदमाश, तरीही कोर्टात जाणार, बच्चू कडूंचा निर्धार
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Deepak Kesarkar On Dhananjay Munde : वाल्मिक कराडला 100% अटक होणार,शंका बाळगू नका
Adani Group Stocks: वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
वर्षाच्या शेवटच्या दिवसात चित्र बदललं, अदानी ग्रुपच्या स्टॉक्समध्ये तेजी, 11 कंपन्यांचे शेअर कितीवर?  
Embed widget