Best Of 2022 : अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केली वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची यादी; जाणून घ्या कोणती गाणी ठरली बेस्ट...
Amazon Music : अॅमेझॉन म्यूझिकने वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची यादी जाहीर केली आहे.
Amazon Music Best Of 2022 : 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या वर्षात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सिनेमे आणि वेबसीरिजसह या वर्षात अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. रोमॅंटिक, रिमिक्स, पॉप सॉंग अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
अॅमेझॉन म्यूझिकने (Amazon Music) नुकतीच या वर्षातील सर्वोत्कृष्ट गाण्यांची (Best Of 2022) यादी जाहीर केली आहे. यात आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाण्यासह अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमातील 'श्रीवल्ली' (Srivalli) गाण्याचा समावेश आहे.
अॅमेझॉन म्यूझिक सर्वोत्कृष्ट गाणी 2022 (Amazon Music Best Of 2022) :
1. अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) गाणं आहे.
2. 'जर्सी' (Jersey) सिनेमातील 'मेहरम' (Mehram) हे गाणं दुसऱ्या स्थानावर आहे. हे गाणं संचेत टंडनने गायलं आहे.
3. 'Gehraiyaan' सिनेमातील 'डुबे' (Doobey) हे गाणं तिसऱ्या स्थानावर आहे. या गाण्यात दीपिका आणि सिद्धांतचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
4. एकतर्फा हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केलेल्या यादीत हे गाणं चौथ्या क्रमांकावर आहे.
5. 'जुग जुग जियो' या सिनेमातील 'द पंजाबन सॉंग' पाचव्या क्रमांकावर आहे. या गाण्यात वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर भांगडा करताना दिसत आहेत.
6. 'पुष्पा' सिनेमातील श्रीवल्ली हे गाणं सहाव्या क्रमांकावर असून या गाण्यातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या केमिस्ट्रिला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
7. 'अतरंगी रे' सिनेमातील 'रेत जरा सी' हे गाणं अरिजीत सिंहने गायलं आहे. या यादीत हे गाणं सातव्या क्रमांकावर आहे.
8. अक्षय कुमार 'बच्चन पांडे' सिनेमातील 'हीर रांझणा' हे गाणं अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केलेल्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
9. अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केलेल्या यादीत 'आंखों से बताना' हे गाणं नवव्या क्रमांकावर आहे.
10. आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमातील 'मेरी जान' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून अॅमेझॉन म्यूझिकने जाहीर केलेल्या यादीत हे गाणं दहाव्या क्रमांकावर आहे. या गाण्याची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे.
संबंधित बातम्या