एक्स्प्लोर
नोटाबंदीनंतरही 'फोर्स-2'ची पहिल्या विकेन्डमध्ये जबरदस्त कमाई

मुंबई : नोटाबंदीमुळे देशभरातील अनेक व्यवसाय कोलमडले आहेत. या नोटाबंदीचा फटका सिनेक्षेत्रालाही बसला. मात्र, यातही 'फोर्स-2' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'फोर्स-2' सिनेमाने पहिल्या विकेन्डमध्ये 20 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली. नोटाबंदीमुळे लोकांकडे सुट्टे पैसे नसल्याचे लक्षात घेऊन सिनेमाच्या तिकिटांचे दर कमी करण्यात आले होते. तिकीट दर कमी असल्याने प्रेक्षकांनीही या संधीचा फायदा उचलत सिनेमा पाहण्यासाठी गर्दी केली. तिकिटाचे दर कमी नसते केले, तर कदाचित याचा फटका 'फोर्स-2'लाही बसला असता. सिनेसमीक्षकांसह प्रेक्षकांनीही 'फोर्स-2' सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या सिनेमाने शुक्रवारी 6.05 कोटी रुपये, शनिवारी 6.50 कोटी रुपये आणि रविवारी 7.50 कोटी रुपयांची कमाई केली. जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांचा अॅक्शन अवतार सर्वांनाच आवडल्याचं दिसून येत आहे. खलनायकाच्या भूमिकेत असलेल्या ताहिर राज भसीन यांच्या अभिनयाचंही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रिकेट























