TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
आलिया आणि रणबीरच्या लग्नाचा बार उद्या उडणार
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये उद्या आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत.
आनंद दिघे यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आनंद दिघेची यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओक साकारणार आहे.
डॉ अमोल कोल्हे यांचा 'विठ्ठल विठ्ठला' लवकरच होणार रिलीज
राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी , स्वराज्य जननी जिजामाता अशा अनेक ऐतिहासिक मालिकांमधून अभिनेते डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. आता अमोल कोल्हेंचा 'विठ्ठल विठ्ठला' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा हा सिनेमा असणार आहे.
अयान मुखर्जीनं आलिया-रणबीरला दिल्या खास शुभेच्छा
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जीने नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. अयाननं ब्रम्हास्त्रमधील गाण्याची झलक शेअर केली आहे.
जेनेलिया डिसूझाने पूर्ण केले 'मिस्टर मम्मी'चे शूटिंग
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचा 'मिस्टर मम्मी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच जेनेलियाने या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या