Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका फेम स्वराविषयी 'या' खास गोष्टी जाणून घ्या
Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका 2 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका फेम स्वराविषयी 'या' खास गोष्टी जाणून घ्या Find out the special things about Tujhech Me Geet Gaat Aahe serial fame tone Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका फेम स्वराविषयी 'या' खास गोष्टी जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/c9feccd22e2bfb9d63ef712631730124_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tujhech Mi Geet Gaat Aahe : 'तुझेच मी गीत गात आहे' (Tujhech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका 2 मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा प्रोमो आऊट झाल्यापासून मालिकेतील स्वराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका बालकलाकार अवनी तायवाडेने साकारली आहे. अवनी मुळची नागपूरची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. अवनीच्या आईने तिची आवड लक्षात घेऊन तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी अवनीने ऑडिशन दिली आणि तिची निवडही झाली. सेटवर अवनी सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेतली आई म्हणजेच ऊर्मिला कोठारेसोबत तिची छान गट्टी जमून आली आहे. आई-मुलीचे इमोशनल सीन अवनी अगदी सहजरित्या साकारते.
View this post on Instagram
गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी उर्मिला कोठारे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
संबंधित बातम्या
Indian Idol Marathi : विजेतेपदासाठी 'या' पाच स्पर्धकांमध्ये रंगणार सुरांची टक्कर
Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला, रणधीर कपूर यांनी सोडलं मौन
Acharya Trailer : बाप-लेक पुन्हा करणार धमाका, चिरंजीवी-राम चरणच्या 'आचार्य'चा ट्रेलर आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)