एक्स्प्लोर
Advertisement
रवी पुजारीच्या मदतीने रेमोला धमकवणारा निर्माता अटकेत
रेमो डिसुझाने 'एनओसी' द्यावी किंवा पाच कोटी रुपये परत करावेत, अशी मागणी चित्रपट निर्माते सत्येंद्र त्यागीने केल्याचा दावा केला जात आहे.
मुंबई : कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला धमकावणारा चित्रपट निर्माता सत्येंद्र त्यागीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. रेमोला धमकावण्यासाठी त्यागीने गँगस्टर रवी पुजारीची मदत घेतल्याचा आरोप आहे.
'डेथ ऑफ अमर' या चित्रपटात सत्येंद्र त्यागीने 2014 मध्ये पाच कोटी रुपये गुंतवले होते. ही रक्कम परत मिळवण्यासाठी त्यागीने रेमोला धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रेमो आणि त्यागी यांनी एकत्रितपणे 'डेथ ऑफ अमर' सिनेमाची निर्मिती केली होती. राजीव खंडेलवाल, झरीन खान यासारखे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. अनेक परदेशी महोत्सवांमध्ये हा सिनेमा पाठवण्यात आला होता, मात्र भारतात तो प्रदर्शित झाला नाही.
दरम्यानच्या काळात रेमो आणि त्यागी यांच्यामध्ये वितुष्ट आलं. रेमोने 'एनओसी' द्यावी किंवा पाच कोटी रुपये परत करावेत, अशी मागणी त्यागीने केल्याचा दावा केला जात आहे. मात्र रेमोच्या कंपनीने दोन्ही देण्यास नकार दिल्याचं म्हटलं जातं.
ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत रवी पुजारीने फोनवरुन रेमो आणि त्याची पत्नी लायझेलला धमकावलं. सत्येंद्र त्यागीला 5 कोटी, एनओसी आणि पुजारीला 50 लाख रुपये खंडणी द्यावी, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी डिसुझांना देण्यात आली.
रेमोच्या पत्नीने मुंबईतील ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी त्यागीला दिल्लीत अटक केली. या केसमध्ये रवी पुजारी 'वाँटेड' आहे.
दुसरीकडे, त्यागीनेही उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये रेमो डिसूझा विरोधात एफआयआर दाखल केला आहे. प्रसाद पुजारी नावाच्या गँगस्टरमार्फत रेमोने धमकी दिल्याचा आरोप त्यागीने केला आहे. आपल्या गाडीवर प्रसाद पुजारीने गोळीबार केल्याचा दावाही त्याने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement