एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Poet Gaddar Death: तेलंगणातील प्रसिद्ध गायक गदर यांचं निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gaddar Death: दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर (Singer Gaddar Death) यांचं रविवारी (6 ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. क्रांतिकारी गीतांसाठी नावाजलेले 'गदर ' यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असं होतं. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली होती.  त्यांच्यावर हैदराबादमधील (Hyderabad) एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते, त्या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. 

Nashik Shortfilm : नाशिकच्या मराठी शॉर्टफिल्मला दुसऱ्यांदा मानव अधिकार आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार, दोन लाखांचे बक्षीस

Nashik News : राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (National Human Rights Commission) आयोजित 8 व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत नाशिकच्या (Nashik) चिरभाेग या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सलग दुसऱ्या वर्षी वर्णी लागल्याने मराठी लघुपटाचा दिल्लीतही डंका वाजला आहे. निलेश आंबेडकर (Nilesh Ambedkar) दिग्दर्शित चिरभोग या मराठी लघुपटाला तब्बल दोन लाख रुपयांचे पारितोषिकही मिळाले आहे. 

Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर'ने भारतात पार केला 100 कोटींचा टप्पा; जगभरात केली 3970 कोटींची कमाई

Oppenheimer Box Office Collection : 'ओपनहायमर' (Oppenheimer) हा हॉलिवूड सिनेमा सध्या चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. भारतीय सिने-रसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे आता हा सिनेमा रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा सिनेमा पाहायला जात आहेत. 'ओपनहायमर' या सिनेमाने भारतात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 

18:25 PM (IST)  •  07 Aug 2023

Sushmita Sen Taali Trailer Out: 'ये कहानी मेरे जैसे कई लोगों की है...'; सुष्मिता सेनच्या 'ताली'चा ट्रेलर रिलीज

Sushmita Sen Taali Trailer Out: अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) 'ताली' (Taali) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता ही गौरी या  ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. एका व्यक्तीचा  गणेश ते गौरी होण्यापर्यंतचा प्रवास ताली या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे, असा अंदाज हा ट्रेलर पाहिल्यानंतर लावला जाऊ शकतो.

View this post on Instagram
 
A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

15:44 PM (IST)  •  07 Aug 2023

Hemangi Kavi: 'खूप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात...'; नेटकऱ्याच्या पोस्टला हेमांगी कवीनं दिलेल्या रिप्लायनं वेधलं लक्ष

Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. हेमांगी ही विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. तसेच चाहत्यांच्या कमेंट्सचा देखील हेमांगी रिप्लाय देते. एका नेटकऱ्यानं नुकतीच  मासिक पाळीबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला हेमांगीनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

14:59 PM (IST)  •  07 Aug 2023

Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' कार्यक्रमात अभिनेत्री वंदना गुप्ते लावणार हजेरी; रंगणार धारदार प्रश्नांसह, खुमासदार उत्तरांची मैफील!

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. आता 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात या अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte)  या हजेरी लावणार आहेत. वंदना गुप्ते या गेल्या काही दिवसांपासून  'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता वंदना गुप्ते या 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात विविध मजेशीर किस्से सांगणार आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

11:23 AM (IST)  •  07 Aug 2023

The Elephant Whisperers : ऑस्कर जिंकुनही पदरी निराशाच; 'द एलिफेंट व्हिस्परर्स'मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप,"म्हणाले,"पैसे मिळाले नाहीत"

The Elephant Whisperers : ऑस्कर विजेता 'द एलिफेंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) हा माहितीपट सध्या चर्चेत आहे. या माहितीपटातील बोमन आणि बेली या जोडप्याने आता 'द एलिफेंट व्हिस्परर्स'च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निर्मात्यांनी पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ऑस्कर (Oscar) जिंकुनही त्यांच्या पदरी निराशाच आहे.

The Elephant Whisperers : ऑस्कर जिंकुनही पदरी निराशाच; 'द एलिफेंट व्हिस्परर्स'मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप,"म्हणाले,"पैसे मिळाले नाहीत"

09:45 AM (IST)  •  07 Aug 2023

Rujuta Deshmukh : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अभिनेत्रीची लूट? ऋजुता देशमुख नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली,"खरचं असा नियम आहे का?"

Rujuta Deshmukh : मराठमोळी अभिनेत्री ऋजुता देशमुख (Rujuta Deshmukh) सध्या चर्चेत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवर प्रवास करताना अभिनेत्रीकडून जास्त टोल आकारण्यात आला आहे. आता अभिनेत्रीची खरचं लूट झाली आहे की खरचं असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का? असा प्रश्न तिने नितीन गडकरींना टॅग करत चाहत्यांना विचारला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Rujuta Deshmukh (@rujutadeshmukhofficial)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget