एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 3 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 3 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत. 

'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमा, अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

Vedat Marathe Veer Daudle Saat Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमात अक्षय कुमार याचा शिवाजी महाराज यांच्या वेषातील लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सिनेमात मला ही संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, असं अक्षय कुमार यावेळी म्हणाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील दिवाळीमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल आणि या डिसेंबर महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.   

Thipkyanchi Rangoli : कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार? 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटेंची होणार एन्ट्री

Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकत्र कुटुंब पद्धती दाखविण्यात आलेल्या या मालिकेने आता वेगळंच वळण घेतलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा विकण्याचा निर्णय विनायक दादांनी घेतला आहे. अशातच मालिकेत दुर्गा आत्याची एन्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे (Shubha Khote) दुर्गा आत्याची भूमिका साकरणार असून बऱ्याच वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत. 

Amitabh Bachchan: सलमाननंतर आता अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ; मिळणार X श्रेणीची सुरक्षा

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. आता अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, बिग बींना आता X श्रेणीची सुरक्षा मिळणार आहे. काल (2 नोव्हेंबर) अभिनेता सलमान खान आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांची देखील सुरक्षा वाढण्यात आली होती. 

लोकप्रिय आणि प्रसिद्ध कलाकारांना काही  प्रकारचे धोका असतात त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात येते. अमिताभ बच्चन यांना यापूर्वी मुंबई पोलिसांची सामान्य सुरक्षा देण्यात आली होती. पण आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून आता त्यांना  X श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.

15:11 PM (IST)  •  03 Nov 2022

Himesh Reshammiya: हिमेश रेशमियाचं मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन; Badass RaviKumar चा टीझर रिलीज

Himesh Reshammiya:  प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक  हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya)  हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. सध्या तो इंडियन आयडॉल 13 (Indian Idol 13) या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारतो. हिमेश हा अभिनय क्षेत्रात देखील काम करतो. आता त्याचा द एक्सपोज या फ्रँचायजीमधील  ‘BADASS रविकुमार’ (Badass RaviKumar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधून तो आता पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

14:03 PM (IST)  •  03 Nov 2022

Shah Rukh Khan: शाहरुखच्या वाढदिवसाला मन्नत बाहेर झालेल्या गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; चार फोन गेले चोरीला

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चाहत्यांचे चार मोबाईल फोन वांद्रे येथील मन्नत बंगल्याबाहेरून चोरीला गेला आहेत. बुधवारी (3 नोव्हेंबर)  शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी शाहरुखची झलक पाहण्यासाठी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर हजारो चाहते जमले होते. जिथे चार चाहत्यांचा महागडा मोबाईल चोरीला गेला. वांद्रे पोलिसांनी मोबाईल चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे महागडा मोबाईल फोन असून यात दोन फोनची किंमत प्रत्येकी एक लाखाहून अधिक आहे. चाहत्यांचे मोबाईल हरवण्याची ही पहिलीच वेळ नाही.  दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी जमते आणि मोबाईल चोर याचा फायदा घेत मोबाईल चोरतात.

13:58 PM (IST)  •  03 Nov 2022

Dhondi Champya: 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' 16 डिसेंबरला होणार प्रदर्शित; 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका

Dhondi Champya: रिलायन्स एंटरटेनमेंट आणि सुनील जैन प्रस्तुत ज्ञानेश भालेकर दिग्दर्शित 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ (Dhondi Champya) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून येत्या 16 डिसेंबर रोजी 'धोंडी चंप्या' ही रेडा आणि म्हशीची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या धमाल चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. प्रभाकर भोगले यांच्या कथेद्वारा प्रेरित होऊन बनवलेल्या या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांनी लिहिले असून यात भरत जाधव, वैभव मांगले हे विनोदाचे दोन बादशाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत सायली पाटील आणि निखिल चव्हाण (Nikhil Chavan) हे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसतील. 

View this post on Instagram
 
A post shared by Nikkhhil Chavaan (@nikkhhil_29)

13:26 PM (IST)  •  03 Nov 2022

Shahid Kapoor: ईशान खट्टरच्या वाढदिवसानिमित्त शाहिदनं शेअर केला खास व्हिडीओ

Shahid Kapoor: अभिनेता ईशान खट्टरचा (Ishaan Khattar) वाढदिवस 1 नोव्हेंबर रोजी होता. यानिमित्तानं शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

11:30 AM (IST)  •  03 Nov 2022

Boney Kapoor: 'पाण्यासारखा पैसा खर्च केला'; भावांच्या बॉलिवूड डेब्यूबाबत बोनी कपूर यांनी दिली माहिती

Boney Kapoor: चित्रपट निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांची मुलगी अभिनेत्री  जाह्नवी कपूरचा  (Janhvi Kapoor) मिली (Mili) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं सध्या ती हे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीमध्ये आता बोनी कपूर यांनी  जाह्नवीला बॉलिवूडमध्ये लाँच न करण्याचं कारण सांगितलं.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget