Boney Kapoor: 'पाण्यासारखा पैसा खर्च केला'; भावांच्या बॉलिवूड डेब्यूबाबत बोनी कपूर यांनी दिली माहिती
एका मुलाखतीमध्ये आता बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी जाह्नवीला (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये लाँच न करण्याचं कारण सांगितलं.
Boney Kapoor: चित्रपट निर्माता बोनी कपूर (Boney Kapoor) हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांची मुलगी अभिनेत्री जाह्नवी कपूरचा (Janhvi Kapoor) मिली (Mili) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं सध्या ती हे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीमध्ये आता बोनी कपूर यांनी जाह्नवीला बॉलिवूडमध्ये लाँच न करण्याचं कारण सांगितलं.
बोनी कपूरच्या प्रोडक्शन हाऊसनं निर्मिती केलेल्या ‘वो सात दिन’ या चित्रपटामधून अभिनेता अनिल कपूरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट 1983 मध्ये रिलीज झाला. तर बोनी कपूरच्या प्रोडक्शन हाऊसच्या ‘प्रेम’ या 1995 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटातून संजय कपूर यांना लाँच करण्यात आलं. बोनी कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्या भावांना लाँच केलं. एका मुलाखतीत याबाबत बोनी कपूर यांनी सांगितलं.
एका मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांना प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्ही बोनी कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्या भावांना लाँच केलं पण त्यांच्या मुलांना म्हणजेच अर्जुन किंवा जाह्नवी यांना का लाँच केलं नाही?' या प्रश्नाचं उत्तर देत बोनू कपूर म्हणाले, 'हा माझा निर्णय होता. मी माझ्या भावाला लाँच केले आणि त्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च केला. ' पुढे ते म्हणाले, "म्हणून, मी ठरवले की माझ्या मुलांना इतर कोणीतरी लॉन्च करावे. एकदा त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली की मी त्यांच्यावर गुंतवणूक करेन.'
बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर याला आदित्य चोपडा यांच्या प्रोडक्शन हाऊसनं लाँच केलं. ‘इश्कजादे’ या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर बोनी कपूर यांची मुलगी जाह्नवी कपूरला करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसनं धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केलं. तर बोनी यांची मुलगी खुशी कपूर ही झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'द आर्चीज' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
बोनी कपूर यांनी वॉन्टेड, वो सात दिन आणि हम पांच या चित्रपटांची निर्मीती केली आहे. ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत. तसेच ते दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचे पती आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Boney Kapoor : बोनी कपूर यांना सायबर फसवणुकीचा फटका; आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल