Varun Dhawan: VD18 च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन चौथ्यांदा जखमी; पायाला झाली दुखापत

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Dec 2023 08:54 PM
Uorfi Javed: ऑर्डर लिहून घेतली अन् जेवण देखील केलं सर्व्ह; उर्फीनं मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये केलं वेट्रेसचं काम
Uorfi Javed: उर्फीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेसचं काम करताना दिसत आहे. Read More
Varun Dhawan: VD18 च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन चौथ्यांदा जखमी; पायाला झाली दुखापत
Varun Dhawan Injured At VD18 Set: वरुणनं त्याच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  वरुण धवन हा VD 18 या चित्रपटाच्या सेटवर चौथ्यांदा जखमी झाला आहे. Read More
VIDEO: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर म्हणाला, "जय माता दी"; नेटकरी भडकले
Ranbir Kapoor: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर, आलिया आणि राहा यांनी हजेरी लावली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
OTT Releases This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज
OTT Releases This Week: या आठवड्यात ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. Read More
Arbaaz Khan Wedding: 'हा गुन्हा नाहीये'; अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाबाबत सलीम खान यांनी सोडलं मौन
Arbaaz Khan Wedding: एका मुलाखतीमध्ये सलीम खान यांनी त्यांचा मुलगा अरबाज याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सांगितलं आहे. Read More
Bipasha Basu Daughter: आलिया आणि रणबीर यांच्या मुलीनंतर आता बिपाशाच्या लेकीची चर्चा; फोटो पाहून नेटकरी म्हणतात...
Bipasha Basu Daughter Devi: अभिनेत्री बिपाशा बासूनं (Bipasha Basu) देखील तिच्या मुलीचा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बिपाशाची लेक देवीच्या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. Read More
Telly Masala : शाहरुखच्या 'डंकी'चा डंका पडला ते कंगनाचा 'तेजस' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्याजाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala: जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Abhishek Bachchan: "तेव्हा कपडे घेणे परवडत नव्हते", कुटुंबाच्या कठीण काळाबद्दल अभिषेकनं सांगितलं, म्हणाला, "बहिणीच्या लग्नातली शेरवानी..."
Abhishek Bachchan: एका मुलाखतीमध्ये अभिषेकनं त्याच्या  कुटुंबच्या कठीण काळाबद्दल देखील सांगितलं. Read More
Upcoming Web Series 2024 : 'मिर्जापूर 3' ते 'पंचायत 3'; 2024 मध्ये रिलीज होणार दमदार वेबसीरिज; प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Upcoming Web Series : नव्या वर्षात अनेक दर्जेदार वेबसीरिज रिलीज होणार आहेत. या सीरिजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. Read More
Merry Christmas Title Song Release: "दिन बड़ा ये ख़ास है,प्यार आस-पास है" ; 'मेरी ख्रिसमस' चं टायटल ट्रॅक रिलीज
Merry Christmas Title Song Release: 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. Read More
Tejas OTT Release : बॉक्स ऑफिसवर आपटलेला कंगना रनौतचा 'तेजस' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल
Tejas : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे घरबसल्या सिनेप्रेमी हा सिनेमा पाहू शकतात. Read More
Anurag Kashyap : सिनेमाचं तिकीट खरेदी करणं आणि मत देणं एकसारखं : अनुराग कश्यप
Anurag Kashyap : अनुराग कश्यपने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सिनेमाचं तिकीट खरेदी करणं आणि मत देणं एकसारखं असल्याचं वक्तव्य केलं आहे. Read More
Neel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन;वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Neel Nanda Passed Away: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. Read More
Bollywood Actress : एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री आज करतेय थेट गूगलमध्ये काम
Mayoori Kango : एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री मयूरी कांगो आज गूगलमध्ये (Google) नोकरी करत आहे. Read More
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा'चं नवं पोस्टर आऊट! कोण साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका?
Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' हा मराठी मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. Read More
Ronit Roy Wedding : अभिनेता रोनित रॉय वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; पत्नीसोबत लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Ronit Roy : अभिनेता रोनित रॉयने वयाच्या 58 व्या वर्षी तिसरं लग्न केलं आहे. लग्नसोहळ्याचे व्हिडीओ अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More
Varun Dhawan : पैसे कमावण्यासाठी कॉलेजमध्ये असताना मद्यविक्रीचा व्यवसाय करायचा वरुण धवन; आज आहे बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय'
Varun Dhawan : वरुण धवन कॉलेजच्या दिवसांत पोट भरण्यासाठी मद्यविक्रिचा व्यवसाय करत होता. अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे. Read More
Salaar Box Office Collection : ख्रिसमसच्या सुट्टीचा प्रभासला फायदा; 'सालार'ने चार दिवसांत जमवला 250 कोटींपेक्षा अधिक गल्ला
Salaar Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. Read More
Nana Patekar : "नरेंद्र मोदीच देशाचे पुन्हा पंतप्रधान"; नाना पाटेकरांचं मोठं वक्तव्य
Nana Patekar : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साडे तीनशे ते पावणे चारशे जागा मिळतील असं भाकित नाना पाटेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलं आहे. Read More
Bigg Boss 17 : सुशांतचे रोमँटिक सीन पाहताना 'अशी' झालेली अंकिता लोखंडेची अवस्था; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा खुलासा
Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडेने पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य केलं आहे. Read More
Dunki Box Office Collection Day 5 : शाहरुखच्या 'डंकी'चा डंका पडला; कमाईत मोठी घसरण
Dunki Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नाताळच्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कमाई केली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.