VIDEO: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर म्हणाला, "जय माता दी"; नेटकरी भडकले
Ranbir Kapoor: कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर, आलिया आणि राहा यांनी हजेरी लावली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ranbir Kapoor: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी ख्रिसमसच्याला (Christmas) त्यांची मुलगी राहाला पहिल्यांदा पापाराझीच्या समोर आणले. कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस पार्टीत रणबीर, आलिया आणि राहा यांनी हजेरी लावली होती. या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन सध्या नेटकरी रणबीरला ट्रोल करत आहेत.
रणबीर म्हणाला 'जय माता दी'
कपूर कुटुंबात वार्षिक ख्रिसमस लंचचे आयोजन करण्यात आले होते, जिथे रणबीर-आलिया देखील त्यांची मुलगी राहासोबत पोहोचले होते. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये केक कटिंग दरम्यान रणबीर हा 'जय माता दी' म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन नेटकरी आता रणबीरला ट्रोल करत आहेत.
रणबीरवर नेटकरी भडकले
ख्रिसमस लंच प्रोग्रॅममधील रणबीरच्या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी रणबीरला ट्रोल केलं आहे. व्हिडीओमध्ये रणबीर हा केकवर आग लावताना दिसत आहे, ज्यावर वाईन ओतण्यात आली आहे. या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "हा काय मुर्खपणा आहे एकीकडे केकवर वाईन ओतली जात आहे आणि दुसरीकडे रणबीर जय माता दी म्हणत आहे. तरीही आपण या अभिनेत्यांना आपला आदर्श मानतो"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
रणबीर आणि आलियानं ख्रिसमस लंच प्रोग्रॅमला येताना त्यांच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर रिव्हिल केला आहे. राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला. आलिया ही अनेकवेळा राहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण या फोटोंमध्ये राहाचा चेहरा रिव्हिल करण्यात आला नव्हता. आता रणबीर आणि आलिया यांनी राहाचा चेहरा रिव्हिल केला आहे.
रणबीरचा काही दिवसांपूर्वी अॅनिमल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रणबीरसोबतच रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: