Salaar Box Office Collection : ख्रिसमसच्या सुट्टीचा प्रभासला फायदा; 'सालार'ने चार दिवसांत जमवला 250 कोटींपेक्षा अधिक गल्ला
Salaar Movie : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
Salaar Box Office Collection Day 4 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजआधीपासून या सिनेमाची चर्चा होती. आता रिलीजनंतरही या सिनेमाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांचा 'सालार' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धमाका करत आहे. ओपनिंग डेपासून हा सिनेमा चांगलीच कमाई करत आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा पैशांचा पाऊस पाडतो आहे. वर्षाच्या शेवटी हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. तसेच आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'सालार'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणऊन घ्या... (Salaar Box Office Collection)
'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला 'सालार'ने 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 62.5 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने 42.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 251.60 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 325 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे.
पहिला दिवस : 90.7 कोटी
दुसरा दिवस : 56.35 कोटी
तिसरा दिवस : 62.05 कोटी
चौथा दिवस : 42.50 कोटी
एकूण कमाई : 251.60 कोटी
'सालार' हा सिनेमा फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 325 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. वीकेंड आणि ख्रिसमसच्या सुट्टीला मोठ्या संख्येने सिनेरसिकांनी 'सालार' हा सिनेमा पाहिला आहे.
View this post on Instagram
'सालार' हा अॅक्शन पॅक्ड सिनेमा आहे. केजीएफ फेम प्रशांत नील यांनी 'सालार' या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमरनसह श्रृती हासन, जगपती बाबू, माइम गोपी, श्रिया रेड्डीसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहे. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सालार : भाग 2 - शौर्यांग पर्व' असे या सिनेमाचे नाव आहे. म्बले फिल्म्सने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
संबंधित बातम्या