OTT Releases This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज
OTT Releases This Week: या आठवड्यात ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
![OTT Releases This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज OTT Releases This Week Kho Gaye Hum Kahan 12th Fail Tiger 3 And More Movies Web Series releasing soon OTT Releases This Week: या आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ओटीटीवर रिलीज होणार 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/26/e312eee749b6b2872df45916c084f0741703594679699259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
OTT Releases This Week: 2023 या वर्षाचे अवघे काही दिवस राहिले आहेत. 2023 या वर्षाला 'बाय' म्हणून 2024 या वर्षाच्या स्वागताला सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेक जण न्यू-ईअर सेलिब्रेट करण्यासाठी विविध प्लॅन्स करत आहेत. काही लोक हॉटेलमध्ये जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करुन न्यू-ईअर सेलिब्रेट करतात तर काही जण घरात आपल्या कुटुंबासोबत न्यू-ईअर सेलिब्रेट करतात अशताच आता 2023 या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात काही वेब सीरिज आणि चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या 2023 या वर्षाचा शेवट मनोरंजनात्मक होणार आहे.
टायगर 3 (Tiger 3 OTT Release Date)
अभिनेता सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दिवाळीच्या खास मुहूर्तावर रिलीज झालेला 'टायगर 3' हा चित्रपट 31 डिसेंबरला OTT वर दाखल होत आहे. Amazon Prime Video वर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
View this post on Instagram
12 वी फेल (12th Fail)
विक्रम मॅसीचा 12 वी फेल हा चित्रपट देखील 29 डिसेंबर रोजी OTT वर रिलीज होत आहे. जर तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहू शकत नसाल, तर आता तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म घरबसल्या हा चित्रपट पाहू शकता.
'खो गये हम कहां' (Kho Gaye Hum Kahan)
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'खो गये हम कहां' हा चित्रपट आज (26 डिसेंबर) रिलीज झाला आहे. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे.
View this post on Instagram
अन्नपूराणी (Annapoorani)
अभिनेत्री नयनताराचा आगामी 'अन्नपूराणी' हा चित्रपटही रिलीजपूर्वीच चर्चेत आहे. हा चित्रपट 29 डिसेंबर रोजी ZEE5 वर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
‘बर्लिन’ (Berlin)
‘बर्लिन’ ही वेबसीरिज देखील ओटीटीवर रिलीज होत आहे. ही मालिका 29 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.
'थ्री ऑफ अस' (Three of Us)
अभिनेत्री शेफाली शाहचा चित्रपट 'थ्री ऑफ अस' हा 29 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.
संंबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)