Dunki Box Office Collection Day 5 : शाहरुखच्या 'डंकी'चा डंका पडला; कमाईत मोठी घसरण
Dunki Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नाताळच्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूपच कमी कमाई केली आहे.
Dunki Box Office Collection Day 5 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. वर्षातला शाहरुखचा हा तिसरा सिनेमा असून या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण डंकी हा सिनेमा 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) या सिनेमांसारखी कमाई करण्यात कमी पडला आहे.
'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Dunki Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला 29.2 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी आणि चौथ्या दिवशी 31.5 कोटींची कमाई केली. तसेच पाचव्या दिवशी या सिनेमाने 22.50 कोटींची कमाई केली.
पहिला दिवस : 29.2 कोटी
दुसरा दिवस : 20.12 कोटी
तिसरा दिवस : 25.61 कोटी
चौथा दिवस : 31.5 कोटी
पाचवा दिवस : 22.50 कोटी
एकूण कमाई : 128.13 कोटी
View this post on Instagram
चाहत्यांना आवडली शाहरुख-तापसीची केमिस्ट्री
'डंकी' या सिनेमाचं दिग्दर्शन बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तर तापसी पन्नू आणि किंग खानची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 'डंकी' या सिनेमात विकी कौशल आणि बोमन ईरानीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
'सालार'चा 'डंकी'ला फटका
शाहरुख खानचा 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर 22 डिसेंबर 2023 रोजी प्रभासचा 'सालार' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही सिनेमे आमने-सामने आहेत. पण 'डंकी' पेक्षा 'सालार'ने सर्वाधिक कमाई केली आहे. त्यामुळे 'सालार'च्या रिलीजचा डंकीला मोठा फटका बसला आहे.
रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत 'डंकी' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. रिलीजच्या पाच दिवसांत जगभरात या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 206 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'डंकी' या सिनेमाचं एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र काही प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला नसल्याचं दिसत आहे.
संंबंधित बातम्या