Chhotya Bayochi Motthi Swapna : 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुचा गायकवाड दिसणार नकारात्मक भूमिकेत
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
03 Sep 2023 04:09 PM
Telly Masala : गश्मीर महाजनीची नवी भूमिका ते अमृता देशमुख-प्रसाद जवादेचं पहिलं केळवण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Read More
Chhotya Bayochi Motthi Swapna : 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुचा गायकवाड दिसणार नकारात्मक भूमिकेत
Rucha Gaikwad : 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
Read More
Kushi Box Office Collection Day 2: समंथा आणि विजयच्या 'खुशी' च्या कमाईत घसरण; जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन
Kushi Box Office Collection Day 2: 'खुशी' (Kushi) हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली? याबाबत जाणून घेऊयात...
Read More
Vivek Agnihotri: जवान पाहणार का? ट्रेलर कसा वाटला? नेटकऱ्यांचे प्रश्न; विवेक अग्निहोत्री उत्तर देत म्हणाले, 'यार, प्लिज शाहरुखला...'
Vivek Agnihotri: काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर विवेक यांना जवान (Jawan) या चित्रपटाबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांना विवेक यांनी उत्तरं दिली आहेत.
Read More
Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' सुपरहिट का झाला? अनुराग कश्यपने सांगितलं कारण
Gadar 2 : अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) नुकत्याच एका मुलाखतीत 'गदर 2' सुपरहिट का झाला हे सांगितलं आहे.
Read More
Amruta Deshmukh And Prasad Jawade: पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे पहिलं केळवण; खास व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री म्हणाली,'आजोबांनी वयाच्या 87 व्या वर्षी...'
Amruta Deshmukh And Prasad Jawade: नुकतेच प्रसाद आणि अमृताचे पहिले केळवण पार पडले. या केळवणाचा व्हिडीओ प्रसाद आणि अमृता यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Read More
Movie Release In September : शाहरुखचा 'Jawan' ते शिल्पा शेट्टीचा 'सुखी'; सिनेप्रेमींसाठी सप्टेंबर महिना खास
Movie : सप्टेंबर महिन्यात सिनेप्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
Read More
Shahid Kapoor Angry On Paparazzi: 'ओरडू नका...'; फोटोग्राफर्सवर भडकला शाहिद कपूर, व्हिडीओ व्हायरल
Shahid Kapoor Angry On Paparazzi: शाहिदच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो फोटोग्राफर्सवर भडकला आहे.
Read More
Rakhi Sawant : "माझ्या जवळ येऊ नका, मी पवित्र आहे"; मक्का-मदीनाला जाऊन आल्यानंतर राखी सावंतने खडसावून सांगितलं, व्हिडीओ व्हायरल
Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More
Friday Night Plan Review: तरुणांच्या त्या पार्टीत दोन भावांची उडाली तारांबळ; कसा आहे “फ्रायडे नाईट प्लॅन”? वाचा रिव्ह्यू
“फ्रायडे नाईट प्लॅन” (Friday Night Plan) हा चित्रपट अशा दोन भावंडांवर आधारित आहे, जे एका पार्टीला एन्जॉय करण्यासाठी जातात पण त्या पार्टीमुळे त्याचा आयुष्याकडे बघणायचा दृष्टिकोन बदलतो.
Read More
Kiran Mane: किरण मानेंनी शेअर केलेल्या मीमनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष; म्हणाले, 'हे मीम लै खोल हाय, एका फटक्यात...'
किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात.
Read More
Kedar Shinde : "शासनाने तुमची दखल गांभीर्याने घेतली नाही..."; शाहीर साबळेंच्या जयंतीनिमित्त केदार शिंदेंची खास पोस्ट
Kedar Shinde : शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा नातू केदार शिंदे यांनी खास पोस्ट लिहिली आहे.
Read More
Gadar 2: शाहरुख खान-गौरी ते अजय- काजोल; गदर 2 च्या ग्रँड सक्सेस पार्टीत सेलिब्रिटींची मांदियाळी
सनी देओलने (Sunny Deol) गदर 2 (Gadar 2) चित्रपटासाठी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते.
Read More
Gashmeer Mahajani : वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचं कमबॅक! पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत
Gashmeer Mahajani : अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर स्टार किड गश्मीर पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
Read More
Gautami Patil : गौतमी पाटीलने घेतली वडिलांची दखल; म्हणाली,"माणुसकीच्या नात्याने..."
Gautami Patil Father : गौतमी पाटीलचे वडील धुळ्यातील रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Read More
Jawan : शाहरुखच्या 'जवान'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली रेकॉर्डब्रेक कमाई! 24 तासांत मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड
Jawan Advance Booking : 'जवान' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'
Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Jawan Trailer Release: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.