Chhotya Bayochi Motthi Swapna : 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री रुचा गायकवाड दिसणार नकारात्मक भूमिकेत
Rucha Gaikwad : 'छोट्या बयोची मोठी स्वप्नं' मालिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
Chhotya Bayochi Motthi Swapna Serial : शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chhotya Bayochi Motthi Swapna) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ (Chhotya Bayochi Motthi Swapna) या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. अभिनेत्री रुचा गायकवाड (Rucha Gaikwad) या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
बयो आता मोठी झालेली दिसणार आहे. बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर दिसत आहे. तर इराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड हि अभिनेत्री पाहता येणार आहे. ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेत रुचा नकारात्मक भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ती पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बयो आणि इरा एकाच मेडिकल महाविद्यलयात शिकणार आहेत तर त्यांच्यातील नोकझोक मालिकेत पाहायला मिळतील. तर आता मालिकेत विजया बाबर आणि रुचा गायकवाड या दोन्ही अभिनेत्री एकत्र काम करताना दिसणार आहेत.
बयो आता मुंबईमध्ये दाखल झाली असून मुंबईतील विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकायला येणार आहे. आता बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर ही गुणी अभिनेत्री दिसणार आहे. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बयो मोठी होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल.
आपल्या भावासोबत मुंबईत स्थायिक असलेल्या इरसाठी हे चॅलेंज ठरणार आहे जेव्हा बयो त्यांच्या कॉलेज मधेच शिकायला येणार आहे. बयो मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या वेगाशी कसं जुळवून घेते, हे आता मालिकेतून पाहायला मिळेल. मुंबई- कोकणात राहणारी सर्वसामान्य मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगते आणि त्या दिशेने आपली वाटचाल करते. तिच्या या खडतर प्रवासात अनेक काटे येतात. पण त्यावरही मात करून ती पुढे जात असते. ही गोष्ट आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतील आहे.
ईराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड पाहायला मिळणार आहे. त्याबरोबरच ओजस मराठे हा अभिनेताही असणार आहे.‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता पाहू शकतात. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली आहे.
संबंधित बातम्या