Friday Night Plan Review: तरुणांच्या त्या पार्टीत दोन भावांची उडाली तारांबळ; कसा आहे “फ्रायडे नाईट प्लॅन”? वाचा रिव्ह्यू
“फ्रायडे नाईट प्लॅन” (Friday Night Plan) हा चित्रपट अशा दोन भावंडांवर आधारित आहे, जे एका पार्टीला एन्जॉय करण्यासाठी जातात पण त्या पार्टीमुळे त्याचा आयुष्याकडे बघणायचा दृष्टिकोन बदलतो.
वत्सल नीलकांतन
बाबिल खान, जुही चावला
Friday Night Plan Review: अनेकवेळा कॉलेजमध्ये असणाऱ्या मुलामुलींमध्ये पार्टी करणारे फिरायला जाणे अशा गोष्टींची क्रेझ असते. “फ्रायडे नाईट प्लॅन” (Friday Night Plan) हा चित्रपट देखील अशाच तरुणांवर आधारित आहे. ज्यांना पार्टी करणे ही गोष्ट थ्रिल करण्यासाठी वाटत असते. हा चित्रपट अशा दोन भावंडांवर आधारित आहे जे पार्टी तर करतात पण त्या पार्टीमुळे त्याचा आयुष्याकडे बघणायचा दृष्टिकोन बदलतो. “फ्रायडे नाईट प्लॅन” हा चित्रपट सिड आणि आदी या दोन भावंडांवर आधारित आहे.आईला न सांगता ही दोन भावंड फ्रायडे नाईट पार्टीला जातात पण या पार्टीत त्या दोघांचीही तारांबळ उडते. त्या पार्टीत काय घडते? सिड आणि आदी पार्टीमध्ये घडणाऱ्या गोष्टी कशा हँडल करतात? हे सर्व फ्रायडे नाईट प्लॅन या चित्रपट दाखवण्यात आले आहे.
फ्रायडे नाईट प्लॅन या चित्रपटाची कथा जरी साधी आणि सरळ असली तरी त्या कथेची मांडणी मात्र अतिशय हटके पद्धतीने करण्यात आली आहे. तरुण मुलांच्या मनात सुरु असणारे विचार त्यांच्याकडून नकळत होणाऱ्या चुका यासर्व गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
कलाकारांचा अभिनय
फ्रायडे नाईट प्लॅन या चित्रपटामध्ये सिड ही भूमिका अभिनेता बाबिल खाननं साकारली आहे. बाबिलनं आपल्या वडिलांप्रमाणेच अतिशन सटल आणि नॅचरल अभिनय केला आहे. बाबिलनं साकारलेल्या सिडसारखी मुलं आपल्या आजूबाजूला अनेकवेळा बघायला मिळतात, असा विचार फ्रायडे नाईट प्लॅन हा चित्रपट पाहिल्यानंतर मनात येतो. तसेच अभिनेत्री जुही चावलानं या चित्रपटात सिडच्या आईची भूमिका साकारली आहे. जुहीची भूमिका जरी छोटी असली तरी तिनं ती चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. अभिनेता अमृत जयननं या चित्रपटामध्ये सिडचा भाऊ आदी ही भूमिका साकारली आहे. शाळेत शिकणारा आदी हा कॉलेजमधील मुलांप्रमाणे कूल राहण्याचा प्रयत्न करतो. तरुणपणात ज्या प्रकारे मुलं आयुष्याकडे पाहत असतात त्याचप्रमाणे आदीचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असतो. अमृत जयनचं या चित्रपटामधील काम मन जिंकते.
आदी आणि सिड यांच्या आयुष्यातील एक रात्र ही त्यांचे जीवन कसे बदलते, हे पाहणं मनोरंजक आहे. जर तुम्ही वीकेंडला फ्रायडे नाईट प्लॅन चित्रपट ओटीटीवर पाहण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. मनोरंजन,भावना आणि कॉमेडी या सगळ्याच गोष्टी या चित्रपट आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.