Virat Kohli Video : गौतम गंभीर जेव्हापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाले आहेत तेव्हापासून त्यांनी आपल्या अनेक निर्णयांनी जागतिक क्रिकेटला चकित केले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीरचा इतका प्रभाव आहे की आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे सुपरस्टार रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. गंभीर यांनी अनेकदा टीम इंडियाला सुपरस्टार संस्कृती संपवण्याची मागणी केली आहे. मायदेशात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यामुळे गौतम गंभीरवरही बरीच टीका झाली होती. मात्र, त्यांनी आपल्या कार्यकाळात संघाच्या वातावरणात अनेक बदल केले आहेत. गंभीरच्या प्रभावामुळेच टीम इंडियाचे सात ते आठ खेळाडू 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजीच्या पुढील फेरीत खेळताना दिसणार आहेत.
विराट कोहली व्हायरल व्हिडिओने चर्चेत
दरम्यान, मुंबईत ताज हाॅटेलसमोरील एका व्हायरल व्हिडिओमुळे कोहलीवर टीकेचा भडिमार होत आहे. हाॅटेलसमोर उतरल्यानंतर कोहलीच्या बाजूला गर्दी दिसून येत आहे. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या एका सीआयएफ जवानाने किंग कोहलीसोबत सेल्फीची मागणी केली. यावेळी तो जवान वर्दीमध्ये होता. त्यामुळे कोहलीला वर्दीमधील जवानासोबत सेल्फी देणे असं काहीच अडचणीचं नव्हतं. मात्र, कोहलीने त्या जवानाला हाताने झिडकारताना दिसून येत आहे. त्यामुळे कर्तव्यावरील जवानासोबत कोहलीने अशा पद्धतीने प्रकटल्याने सोशल मीडियात अनेकांचा संताप अनावर झाला आहे. काहीनी त्याची अहंकारी अशी संभावना केली. काहींनी त्याची कामगिरी समोर आणत हल्ला चढवला.
दुसरीकडे रोहितच्या व्हिडिओची चर्चा
दरम्यान, आणखी एक व्हिडिओ विमानतळावरील व्हायरल झाला असून टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा विमानतळावर आल्यानंतर चेकअप पूर्ण झाल्यानंतर बायको आणि मुलगीला पुढे पाठवून उपस्थित पोलिस आणि चाहत्यांना सेल्फी देताना आरामात दिसून येत आहे. आणखी एका जवानासोबतचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या दोन्ही व्हायरल व्हिडिओची तुलना करत कोहलीला चांगलेच झोडून काढत आहेत.
विराट कोहली 12 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार
कोहली 2012 नंतर रणजी ट्रॉफीमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. मानेच्या ताणामुळे कोहली 23 जानेवारीपासून सौराष्ट्र विरुद्ध दिल्लीच्या आगामी सामन्याला मुकणार आहे, परंतु त्याने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) ला कळवले आहे की तो संघाचा शेवटचा रणजी ट्रॉफी लीग सामना खेळण्यासाठी उपलब्ध असेल.
रोहित शर्मा 10 वर्षांनंतर रणजीमध्ये दिसणार
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी संघाच्या घोषणेच्या वेळी स्पष्ट केले होते की तो 23 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत खेळणार आहे. सोमवारी मुंबईचा संघ जाहीर झाला तेव्हा त्यात रोहितचे नाव होते. तो जम्मू-काश्मीरविरुद्ध डावाची सुरुवात करेल. रोहित आणि विराट व्यतिरिक्त त्यात ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शुभमन गिल यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या