एक्स्प्लोर

Shahid Kapoor Angry On Paparazzi:  'ओरडू नका...'; फोटोग्राफर्सवर भडकला शाहिद कपूर, व्हिडीओ व्हायरल

Shahid Kapoor Angry On Paparazzi: शाहिदच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो फोटोग्राफर्सवर भडकला आहे.  

Shahid Kapoor Angry On Paparazzi:  बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण शाहिद हा सध्या त्याच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. शाहिदच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो फोटोग्राफर्सवर भडकला आहे.  

शाहिद हा नुकताच पत्नी मिरासोबत मुंबईमध्ये स्पॉट झाला. यावेळी अनेक फोटोग्राफर्सनं मिरा आणि शाहिद यांना घेरलं. हे फोटोग्राफर्स शाहिदला पाहिल्यानंतर फोटोसाठी ओरडू लागले. शाहिदच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  शाहिद  मागे वळतो आणि पापाराझींवर ओरडतो. शाहिद हा फोटोग्राफर्सला म्हणतो, 'तुम्ही पुन्हा पुन्हा का ओरडता? मी इथे उभा आहे. ओरडू नका. मी गाडीत बसून गेल्यानंतर ओरडा आता, शांत राहा.'  शाहिदच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शाहिदच्या  व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'भाऊ, खरंच हे लोक खूप इरिटेड करतात.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली,'तो खरा कबीर सिंह बनून सर्वांना मारेल'

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

शाहिदच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  शाहिद लवकरच मोठ्या पडद्यावर कृती सेननसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद आणि कृती यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये दोघांची  केमिस्ट्री पाहायला मिळाली.  या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही, मात्र चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गेल्या वर्षी शाहिद हा जर्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर त्याची फर्जी ही वेब सीरिज रिलीज झाली. या वेब सीरिजमधील शाहिदच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी त्याचा ब्लडी डॅडी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  शाहिद अन् क्रितीचा रोमँटिक अंदाज; आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget