![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jawan : शाहरुखच्या 'जवान'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली रेकॉर्डब्रेक कमाई! 24 तासांत मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड
Jawan Advance Booking : 'जवान' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
![Jawan : शाहरुखच्या 'जवान'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली रेकॉर्डब्रेक कमाई! 24 तासांत मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड Shah Rukh Khan Jawan Advance Booking jawan advance booking goes berserk beats pathaan 24 hour record morning shows open now srk bollywood movie entertainment Jawan : शाहरुखच्या 'जवान'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच केली रेकॉर्डब्रेक कमाई! 24 तासांत मोडला 'पठाण'चा रेकॉर्ड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/e2cfeaf06eb2d6abea1ad8a35af35cc21693711401956254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Jawan Advance Booking : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 24 तासांत या सिनेमाने 'पठाण'चा (Pathaan) रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
'जवान'च्या निर्मात्यांनी 1 सप्टेंबरपासून अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात केली आहे. अॅडव्हास बुकिंगला सुरुवात होताच शाहरुखच्या चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बुक करण्यावर भर दिला आहे. आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला 24 तास पूर्ण झाले आहेत. या 24 तासांत सिनेमाने दणदणीत कमाई केली आहे.
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच पहिल्या 24 तासांत 'जवान'च्या 1 लाख 65 हजारापेक्षा अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. आतापर्यंत किंग खानच्या 'पठाण'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये सर्वाधिक कमाई केली होती. 'पठाण'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 1 लाख 17 हजार तिकीटांची विक्री केली होती. आता त्याच्याच 'जवान'ने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 'जवान'ने फर्स्ट डे फर्स्ट शो साठी अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच पहिल्या 24 तासांत तीन लाखांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
रिलीजआधीच 'जवान'चा धमाका
'पठाण'चे पहिल्या दिवसाचे 10 लाखापेक्षा अधिक तिकीट अॅडव्हान्स बुकिंगमध्ये विकले गेले होते. तर सिनेमाचं अॅडव्हान्स ग्रॉस कलेक्शन 32 कोटी रुपयांपेक्षा अधिक होतं. त्यानंतर आलेल्या 'गदर 2' या सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 7 लाखापेक्षा अधिक तिकीट विकले गेले. आता 'जवान' हा सिनेमा 'गदर 2' आणि 'पठाण' पेक्षा अधिक कमाई करू शकतो असे म्हटले जात आहे.
शाहरुखच्या 'जवान'चे दिल्ली-मुंबईत सकाळचेही शो आहेत. दिल्लीत 'जवान'चा पहिला शो सकाळी 6:40 चा आहे. तर मुंबईत पहिला शो 6:30 चा आहे. 'पठाण'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली होती. शाहरुखच्या या कमबॅक सिनेमाने भारतात 70 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता 'जवान' किती कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'जवान' करणार रेकॉर्डब्रेक कमाई
शाहरुखचा 'जवान' सिनेमा 'पठाण'चा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो, असे म्हटले जात आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा 125 कोटींची कमाई करू शकतो. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहरुखसह या सिनेमात नयनतारादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 7 सप्टेंबरला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या
Jawan Trailer : बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख खानच्या 'जवान'चा ट्रेलर; चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)