Gashmeer Mahajani : वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीचं कमबॅक! पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत
Gashmeer Mahajani : अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर स्टार किड गश्मीर पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.

Gashmeer Mahajani New Project : अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला अर्थात स्टार किड म्हणून लोकप्रिय असलेल्या गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) प्रचंड ट्रोल करण्यात आले. पण आता वडिलांच्या निधनानंतर अभिनेता पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. रुपेरी पडदा गाजवण्यासाठी तो सज्ज आहे.
गश्मीर महाजनी पुन्हा दिसणार ऐतिहासिक भूमिकेत!
अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani New Marathi Movie) गेल्या काही दिवसांपासून रुपेरी पडद्यापासून दूर होता. पण आता नव्या भूमिकेच्या माध्यमातून मोठा पडदा गाजवायला तो सज्ज आहे. अभिनेता आता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. पण तो नक्की काय भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
गश्मीरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"पुन्हा एकदा तोच प्रवास...लवकरच..". गश्मीरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने आजवर साकारलेल्या ऐतिहासिक भूमिकांची झलक पाहायला मिळत आहे. सर्व फोटोंचा कोलाज करून त्याने हा व्हिडीओ बनवला आहे. त्यामुळे गश्मीरच्या आगामी ऐतिहासिक सिनेमाची आणि भूमिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
गश्मीरने व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांसोबत प्रश्नोत्तराचं सेशन घेत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. एका चाहत्यानं विचारलं आहे,"आगामी सिनेमात संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेस का? त्यावर उत्तर देत तो म्हणाला,"अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करा...हा त्याकाळातील सिनेमा असला तरी आजवर तुम्ही कधीही न पाहिलेला अॅक्शनपट असेल. या सिनेमात अभिनयासह मी अॅक्शनदेखील करणार आहे". आणखी एका चाहत्याला उत्तर देत तो म्हणाला,"त्या काळातील साहसपट करत आहे..एवढचं खरं. योग्य वेळ आली की माहिती देईन".
गश्मीरने प्रवीण तरडेंच्या (Pravin Tarde) 'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. त्याचा आगामी सिनेमाही प्रवीण तरडेंचाच असणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. गश्मीरच्या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली असून प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या























