Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' सुपरहिट का झाला? अनुराग कश्यपने सांगितलं कारण
Gadar 2 : अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) नुकत्याच एका मुलाखतीत 'गदर 2' सुपरहिट का झाला हे सांगितलं आहे.
Anurag Kashyap On Sunny Deol Gadar 2 Success : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) अभिनीत 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 2023 मधला सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) 'गदर 2' हा सिनेमा सुपरहिट का झाले ते सांगितलं आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सिने-निर्माता अनुराग कश्यप म्हणाला,"मी 'गदर 2','ओएमजी 2' आणि 'ड्रीम गर्ल 2' हे कोणतेच सिनेमे पाहिलेले नाहीत. मी माझ्या कामात व्यस्त आहे. पण मी नक्कीच वेळ काढून हे सिनेमे पाहणार आहे".
'गदर 2'च्या यशाचं श्रेय 'गदर' : अनुकाग कश्यप
अनुराग कश्यप पुढे म्हणाले,"गदर 2' या सिनेमाचं जोरदार मार्केटिंग केलं आहे, असं मला वाटतं. 'गदर' सिनेमासोबत प्रेक्षकांच्या आठवणी आहेत. 'गदर' हा गाजलेला सुपरहिट सिनेमा आहे. जुन्या आठवणी ताज्या करण्याचं काम 'गदर' सिनेमाने चांगलं केलं आहे. हाच या सिनेमाच्या मार्केटिंगचा फंडा होता. 'गदर 2'च्या मार्केटिंगचं श्रेय 'गदर'ला द्यायला हवं".
'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजआधीपासून चर्चेत असणाऱ्या या सिनेमाची क्रेझ आजही कायम आहे. अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 1991 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तारा सिंह आपल्या मुलाला अर्थात चरणजीतला घ्यायला पाकिस्तानात जातो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. तारा सिंह आणि सकीनाच्या जोडीने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. ऑस्करसाठी 'गदर 2'ची एन्ट्री पाठवली जाऊ शकते.
'गदर 2'ने पार केला 500 कोटींचा टप्पा (Gadar 2 Box Office Collection)
11 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या 'गदर 2'ची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. प्रेक्षक पुन्हा-पुन्हा हा सिनेमा पाहत आहेत. 'गदर 2'ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 284.63 कोटी, दुसऱा आठवडा 134.47 कोटी, तिसरा आठवडा 63.35 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या 24 दिवसांत या सिनेमाने आतापर्यंत 500.87 कोटींची कमाई केली आहे.
अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या सिनेमात तारा सिंहच्या मुलावर केंद्रित करण्यात आला आहे. 'गदर: एक प्रेम कथा' हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील तारा सिंह आणि सकिनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता 22 वर्षांनंतरही त्यांची क्रेझ कायम आहे. या सिनेमाचा तिसरा भागदेखील येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या