Subhedar : 'सुभेदार'ची विक्रमी कमाई! पहिल्या विकेंडला जमवला 8.74 कोटींचा गल्ला

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 01 Sep 2023 04:05 PM
Telly Masala : गौतमी पाटीलचं नवं गाणं ते 'सुभेदार'ची विक्रमी कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Kushi Review : विजय देवरकोंडा आणि समंथाचा 'खुशी' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Kushi : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा 'खुशी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Subhedar : 'सुभेदार'ची विक्रमी कमाई! पहिल्या विकेंडला जमवला 8.74 कोटींचा गल्ला
Subhedar : 'सुभेदार' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. Read More
Aparna Nair Death : मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायरचा संशयास्पद मृत्यू; घरातच आढळला मृतदेह
Aparna Nair : अभिनेत्री अपर्णा नायर राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे. Read More
Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका रोमांचक वळणावर; अक्षरा-अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह!
Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत अक्षरा-अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह रंगणार आहे. Read More
Sayali Sanjeev : वडिलांच्या आजारपणात बाप्पाकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली; अभिनेत्री सायली संजीवच्या पाठीशी गणराया
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा बाप्पा' या सेगमेंटच्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि बाप्पाचं नातं कसं आहे... Read More
Gautami Patil : "माझा कारभार सोपा नसतोय रं"; गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणाले...
Gautami Patil : गौतमी पाटीलचं "माझा कारभार सोपा नसतोय रं" हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Nayanthara Instagram Debut: अभिनेत्री नयनताराची इन्स्टाग्रामवर एन्ट्री; शेअर केला मुलांसोबतचा क्युट फोटो
Nayanthara Instagram Debut:  नयनतारानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं आहे. नुकताच तिनं एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. Read More
KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती 15'ला मिळाला पहिला करोडपती! 21 वर्षांच्या जसकरणने जिंकले एक कोटी रुपये
KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती 15'ला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे. Read More
Jawan Trailer : बुर्ज खलिफावर झळकला शाहरुख खानच्या 'जवान'चा ट्रेलर; चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा
Jawan Trailer At Burj Khalifa : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'चा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.