KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती 15'ला मिळाला पहिला करोडपती! 21 वर्षांच्या जसकरणने जिंकले एक कोटी रुपये
KBC 15 : 'कौन बनेगा करोडपती 15'ला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे.
Kaun Banega Crorepati 15 : 'कौन बनेगा करोडपती 15' (Kaun Banega Crorepati 15) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. या कार्यक्रमात प्रत्येकवेळी कोणी ना कोणी स्पर्धक करोडपती होत असतो. आता नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. 'कौन बनेगा करोडपती 15'ला पहिला करोडपती मिळाला आहे. 21 वर्षांच्या तरुणाने जसकरण सिंहने (Jaskara Singh) एक कोटी रुपये जिंकले आहेत.
'कौन बनेगा करोडपती 15'चा प्रोमो आऊट (Kaun Banega Crorepati 15 Promo Out)
'कौन बनेगा करोडपती 15'च्या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन म्हणत आहेत,"ज्ञानाच्या मंचावर आजवर मी अनेक स्पर्धकांना करोडपती होताना पाहिलं आहे. पण त्या एका प्रश्नावर स्पर्धकांसह तुम्हा प्रेक्षकांच्या छातीत धडधड व्हायला सुरू होते. सात कोटी रुपयांसाठीचा तो प्रश्न असतो. आता सात कोटी रुपयांसाठी हा आहे सोळावा प्रश्न...त्यानंतर स्पर्धक सोळाव्या प्रश्नासाठी सज्ज असलेला दिसत आहे".
'कौन बनेगा करोडपती 15'चा विशेष भाग कधी पाहायला मिळणार?
'कौन बनेगा करोडपती 15'चा विशेष भाग प्रेक्षकांना 4 आणि 5 सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे. सोनी टीव्हीने प्रोमो शेअर करत कॅप्शन लिहिलं आहे,"कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असतं. सात कोटी रुपयांचा प्रश्न विचारल्यावर प्रेक्षकांच्या छातीत धडधड व्हायला सुरू होते".
बिग बींनी चाहत्यांचे मानले आभार
बिग बी यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. महानायक म्हणाले,"दररोज 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवर मी चमत्कार होताना पाहतो. सेटवर येऊन मी शूटिंगला सुरुवात करतो तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्सुकता असते. माझ्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक टाळी ही खऱ्या आयुष्यात मला खूप काही देत असते. उपस्थित प्रेक्षकांसह टीव्हीवर कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक माझ्यासाठी सर्वकाही आहेत. तुम्ही माझ्यासोबत नाही असा एकही क्षण नाही.
एक कोटी जिंकलेल्या जसकरणबद्दल जाणून घ्या...
अमृतसर येखील डीएव्ही महाविद्यालयात बीएससी इकोनॉमिक्सचं शिक्षण घेणाऱ्या जसकरण सिंहने एक कोटी रुपये जिंकले आहेत. आता तो सात कोटी रुपये जिंकणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. जसकरणच्या यशात त्याचे शिक्षक, आई-वडील आणि महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. जसकरणचे वडील कॅटरिंगचं काम करतात तर आई गृहिणी आहे. जसकरणला क्रिकेटचीदेखील आवड आहे.
संबंधित बातम्या