![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Telly Masala : गौतमी पाटीलचं नवं गाणं ते 'सुभेदार'ची विक्रमी कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
![Telly Masala : गौतमी पाटीलचं नवं गाणं ते 'सुभेदार'ची विक्रमी कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... marathi movie telly masala marathi serial latest update marathi movies Gautami Patil New Song Maza Karbhar Sopa Nastoy Sayali Sanjeev Tula Shikvin Changlach Dhada Subhedar Box Office Collection Madhurani Prabhulkar post Telly Masala : गौतमी पाटीलचं नवं गाणं ते 'सुभेदार'ची विक्रमी कमाई; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/01/6376b920a9de3f7bb23e52989a63f94a1693564487938254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Gautami Patil : "माझा कारभार सोपा नसतोय रं"; गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणाले...
Gautami Patil New Song Maza Karbhar Sopa Nastoy : 'सबसे कातील गौतमी पाटील' (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या नृत्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या गौतमीचं आता नवं गाणं (Gautami Patil New Song) आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'माझा कारभार सोपा नसतोय रं' (Maza Karbhar Sopa Nastoy) असं या गाण्याचं नाव आहे. सोशल मीडियावर (Social Media) या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sayali Sanjeev : वडिलांच्या आजारपणात बाप्पाकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली; अभिनेत्री सायली संजीवच्या पाठीशी गणराया
Sayali Sanjeev On Kalavantancha Ganesh : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र या उत्सावाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच मंडळी सज्ज आहेत. मग सेलिब्रिटी तरी यात कसे मागे पडतील. तुमची लाडकी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि बाप्पाचंही (Ganapati Bappa) खास नातं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका रोमांचक वळणावर; अक्षरा-अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह!
Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता या मालिकेत अक्षरा-अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह (Tula Shikvin Changlach Dhada Engagement Special Episode) रंगणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Subhedar : 'सुभेदार'ची विक्रमी कमाई! पहिल्या विकेंडला जमवला 8.74 कोटींचा गल्ला
Subhedar Box Office Collection : 'सुभेदार' (Subhedar) या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. रिलीजआधी पासून चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत 'सुभेदार'ने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या विकेंडला या सिनेमाने 8.74 कोटींचा गल्ला जमवला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकर यांना चाहतीनं दिलं खास गिफ्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, 'मन इतकं भरून येतं...'
Madhurani Prabhulkar: अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. मधुराणी या आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारतात. त्यांच्या या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. मधुराणी यांना अनेक चाहते विविध गिफ्ट्स पाठवत असतात. मधुराणी यांच्या एका चाहतीनं नुकतेच एक खास गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टचा व्हिडीओ मधुराणी प्रभुलकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)