Dunki Box Office Collection Day 2 : शाहरुखची जगभर चर्चा! रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी 'डंकी'च्या कमाईत घसरण
Dunki Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' हा सिनेमा जगभरात चांगलीच कमाई करत आहे.
Shahrukh Khan Dunki Box Office Collection Day 2 : सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. वर्षाच्या शेवटी शाहरुखने प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. सर्वत्र या सिनेमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. 'डंकी' या सिनेमाची रिलीजआधीपासून चांगलीच चर्चा होती. आता रिलीजनंतरही चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
'डंकी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Dunki Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'डंकी' या सिनेमाने भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.2 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 20.00 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 49.20 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने 58 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे.
गौरी खानची खास पोस्ट (Gauri Khan Post)
'डंकी' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत 58 कोटींची कमाई केल्यानंतर गौरी खानने खास पोस्ट लिहिली आहे. गौरीने लिहिलं आहे,"खूप दुरुन आलो आहोत...आता तुमच्या प्रेमाने आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे". जगभरातून 'डंकी' या सिनेमाला शाहरुखच्या चाहत्यांचं आणि सिनेप्रेमींचं प्रेम मिळत आहे.
View this post on Instagram
शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी सांभाळली आहे. या सिनेमात शाहरुखसह तापसी पन्नू, विक्रम कोचर, अनिल ग्रोवर, बोमन ईरानी आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 'डंकी फ्लाईट'वर आधारित आहे. या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या कामाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
'डंकी'चं कथानक काय? (Dunki Movie Story)
'डंकी' या सिनेमात चार मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. या चार मित्रांची परदेशात जाण्याची इच्छा असते. पण पोसपोर्ट आणि वीजा नसल्याने विदेशात जाण्यासाठी ते चुकीचा मार्ग निवडतात. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एकंदरीतच 'डंकी' हा कौटुंबिक सिनेमा आहे.
'पठाण' आणि 'जवान' या सिनेमानंतर शाहरुखचा 'डंकी' हा 2023 मधला तिसरा ब्लॉकबस्टर सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 'पठाण' आणि 'जवान'पेक्षा डंकी या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांत कमी कमाई केली आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या दोन्ही सिनेमांनी 1000 कोटींची कमाई केली आहे.
संंबंधित बातम्या