एक्स्प्लोर
'Drishyam 2' मध्ये जबरदस्त सस्पेंस.
चित्रपटाचा पहिला भाग जिथे संपतो तिथूनच खऱ्या अर्थाने चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटाचा ट्रेलरदेखील गाजला होता. चित्रपटाचे कथानक असे आहे की, चित्रपटातील नायक आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.
'दृश्यम 2' हा सुपरहिट मल्याळम चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्यात आला. तुम्ही जर आधीचा दृष्यम चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला दृष्यम 2 पाहण्याची अधिक उत्सुकता असेल. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉनवर जाऊन बघू शकता. या चित्रपटात साऊथचा लोकप्रिय अभिनेता 'मोहनलाल' याची मुख्य भूमिका आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन जीतु जोसफ यांनी केले आहे. तसेच चित्रपटात मोहनलाल व्यतिरिक्त मीना, सिद्दीकी, आशा शरत, मुरली गोपी, अनसिबा,साईकुमार यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा पहिला भाग जिथे संपतो तिथूनच खऱ्या अर्थाने चित्रपटाची सुरुवात होते. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी नायक कोणत्याही थराला जातो.
दृश्यम चित्रपटाचा पहिला पार्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मल्याळममधील चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर हिंदी रिमेक देखील आला होता. हिंदी रिमेकमध्ये अजय देवगनने मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता आणि तब्बू अहम दिसून आले होते. आता मल्याळम भाषेतील चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक हिंदीतल्या रिमेकचा दुसरा भाग कधी येणार याची वाट बघत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement