(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pushpa Crakers On Diwali: 'फ्लॉवर नहीं फायर है'; पुष्पाची क्रेझ अजूनही कायम; फटाक्यांवर अल्लू अर्जुनचा फोटो
अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) वेगवेगळे फोटो फटाक्यांच्या बॉक्सवर लावण्यात आले आहेत. या बॉक्सवर 'फ्लावर नहीं फायर है' हा डायलॉग देखील लिहिलेला दिसत आहे.
Pushpa Crakers On Diwali: देशभरात दिवाळी (Diwali 2022) उत्साहानं साजरी केली जात आहे. अनेक लोक दिवाळीला ] वेगवेगळे फटाके फोडतात. पाऊस, फुलबाजी, रॉकेट, सुतळी बॉम्ब इत्यादी फटाके सध्या मार्केटमध्ये मिळत आहेत. नुकताच काही फटाक्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, फटाक्यांच्या बॉक्सवर अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) फोटो लावण्यात आला आहे. हा फोटो अल्लू अर्जुनच्या पुष्पा (Pushpa) चित्रपटातील लूकचा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विविध प्रकारचे फटाके दिसत आहेत. हा व्हिडीओ ठाणे या भागातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनचे वेगवेगळे फोटो फटाक्यांच्या बॉक्सवर लावण्यात आले आहेत. या बॉक्सवर 'फ्लावर नहीं फायर है' हा डायलॉग देखील लिहिलेला दिसत आहे. एक महिला हे फटाके बघत आहे, असंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
#PushpaRaj Fever Takes Over The Festival Of Lights 🤩🔥@alluarjun @PushpaMovie @MythriOfficial #Pushpa #PushpaTheRule #AlluArjun pic.twitter.com/SRflGxojM4
— TelanganaAlluArjunFC™ (@TelanganaAAFc) October 21, 2022
पुष्पा द राइज हा चित्रपट 2021 मध्ये जगभरात रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
पुष्पाः2 कधी होणार रिलीज
‘पुष्पा: द रूल’ हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर 2022 मध्ये सुरु होणार आहे. रिपोर्टनुसार, अभिनेता विजय सेतुपती हा पुष्पा: द रूल या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात विजय सेतुपतीची एन्ट्री होणार असल्यानं चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
अनेक लोक दिवाळीला फटाके फोडतात. फोडताना अनेकांना प्रदूषण होते. फटाके न फोडता दिवाळी साजरी केल्यानं प्रदुषण देखील होणार नाही आणि दुखापत देखील होणार नाही, त्यामुळे अनेक लोक दिवाळी ही इको फ्रेंडली पद्धतीनं साजरी करत असतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: