Rani Chatterjee: फटाका फोडताना घडली घटना; अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, 'मी वाचले, तुम्ही सुरक्षित राहा'
नुकताच अभिनेत्री राणी चॅटर्जीनं (Rani Chatterjee) एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती फटाका फोडताना दिसत आहे.

Rani Chatterjee : देशभरात दिवाळीचा (Diwali 2022) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक सेलिब्रिटी दिवाळीला ट्रेडिशनल लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. नुकताच अभिनेत्री राणी चॅटर्जीनं (Rani Chatterjee) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती फटाका फोडताना दिसत आहे. हा फटाका फोडताना एक घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
राणीचा व्हिडीओ व्हायरल
राणीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राणी फुलबाजीनं फटाका फोडताना दिसत आहे. पाऊस हा फटका ती फुलबाजीनं लावते पण तो फटाका पावसाप्रमाणे उडण्याऐवजी बॉम्बसारखा उडतो. राणीनं हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'काल हे घडलं. मी वाचले पण प्लिज तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा.' राणीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.
राणीच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
राणीच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन फटाके न फोडण्याचा सल्ला राणीला दिला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तू ठिक आहेस ना?' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'माझ्यासोबत देखील अशीच घटना घडली होती.'
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
फटाके फोडताना अनेकांना प्रदूषण होते. त्यामुळे फटाके न फोडता दिवाळी साजरी केल्यानं प्रदुषण देखील होणार नाही आणि दुखापत देखील होणार नाही, त्यामुळे अनेक लोक दिवाळी ही इको फ्रेंडली पद्धतीनं साजरी करत असतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
