VIDEO : दिव्या भारतीचा पुनर्जन्म? तीच नजर, तोच चेहरा; अभिनेत्रीची फुल्ल कार्बन कॉपी, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल
Divya Bharti Lookalike Video Viral : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी असून ती हुबेहूब दिव्या भारतीप्रमाणे दिसत आहे.
Divya Bharti Lookalike : 90 च्या दशकात अनेक टॉप अभिनेत्रींचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला होता. अनेक अभिनेत्रींना फार कमी वयात मोठा स्टारडम मिळाला. अशीच एक अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री दिव्या भारतीला फार कमी वयात प्रसिद्धी मिळाली. दिव्या पहिल्याच चित्रपटापासून प्रसिद्धीझोतात आली. तिने झटपट यशाचं शिखर गाठलं, पण तितक्याच लवकर तिने जगाचा निरोपही घेतला. आज दिव्या भारती या जगात नसली तरी, तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
अभिनेत्री दिव्या भारतीचा पुनर्जन्म?
अभिनेत्री दिव्या भारतीचे (Divya Bharti) जेव्हा इंडस्टीमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा मोठी खळबळ उडाली होती. पहिल्याच चित्रपटापासून हिट ठरलेली दिव्या भारती इतर अभिनेत्रींना तगडी टक्कर देत होती. तिने अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. आज ती हयात असती, तर तिने अनेक सौंदर्यवतींना अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या बाबतीत मागे टाकलं असतं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दिव्या भारतीने तिच्या छोट्याश्या कारकिर्दीत मोठमोठे हिट चित्रपट दिले आहेत, ज्यांची छाप आजही चाहत्यांच्या मनावर कायम आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमधील तरुणी कोण?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी असून ती हुबेहूब दिव्या भारतीप्रमाणे दिसत आहे. दिव्या भारतीसारखी दिसणारी एक तरुणी तिच्या गाण्यांवर अभिनय करताना दिसत आहे. हा व्हिडी निशा ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणी दिव्या भारतीच्या 'सात समंदर पार मैं तेरे...' या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे.
तीच नजर, तोच चेहरा...
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :