Dada Saheb Phalke Award : देविका रानी यांना मिळाला पहिला 'दादासाबेब फाळके पुरस्कार'; जाणून घ्या संपूर्ण यादी...
Asha Parekh : बॉलिवूड अभिनेत्री आशा पारेख यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
Dada Saheb Phalke Award : 'दादासाबेब फाळके पुरस्कार' (Dada Saheb Phalke Award) हा भारतीय सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक' म्हणून ओळखले जाणारे 'दादासाहेब फाळके' (Dada Saheb Phalke) यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
देविका रानी यांना मिळाला पहिला 'दादासाबेब फाळके पुरस्कार'
भारतीय सिनेसृष्टीत योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी भारत सरकारच्या 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येते. 1969 सालापासून 'दादासाहेब फाळके पुरस्कार' दिला जात आहे. अभिनेत्री देविका रानी यांना 1969 साली पहिल्या 'दादासाहेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.
'दादासाबेब फाळके पुरस्कार' सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीचा डंका
मराठमोळ्या अभिनेत्री दुर्गा खोटे (1983), अभिनेता, लेखक, दिग्दर्शक वी. शांताराम (1985), गानकोकिळा लता मंगेशकर (1989), दिग्दर्शक, सिनेनिर्माते, पटकथा लेखक भालचंद्र पेंढारकर (1991), गायिका आशा भोसले (2000) अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांना 'दादासाबेब फाळके पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत पाच मराठमोळ्या कलाकारांना मानाच्या 'दादासाबेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.
- देविका रानी - (अभिनेत्री) - 1969
- वीरेन्द्रनाथ सरकार - (सिनेनिर्माता) - 1970
- पृथ्वीराज कपूर - (अभिनेता) - 1971
- पंकज मलिक - (संगीत दिग्दर्शक) - 1972
- रुबी मय्यर्स - (अभिनेत्री) - 1973
- बी.एन. रेड्डी - (दिग्दर्शक) - 1974
- धीरेननाथ गांगुली - (अभिनेता, दिग्दर्शक) - 1975
- कानन देवी - (अभिनेत्री) - 1976
- नितिन बोस - (दिग्दर्शक) - 1977
- रायचंद बोरल - (संगीत दिग्दर्शक) - 1978
- सोहराब मोदी - (अभिनेता, दिग्दर्शक) - 1979
- पैदी जयराज - (अभिनेता, दिग्दर्शक) - 1980
- नौशाद अली - (संगीत दिग्दर्शक) - 1981
- एल. वी. प्रसाद - (अभिनेता, दिग्दर्शक, सिनेनिर्माता) - 1982
- दुर्गा खोटे - (अभिनेत्री) - 1983
- सत्यजीत रे - (दिग्दर्शक) - 1984
- वी. शांताराम - (दिग्दर्शक, सिने-निर्माता, अभिनेता) - 1985
- बी. नागी रेड्डी - (सिने-निर्माता) - 1986
- राजकपूर - (अभिनेता, दिग्दर्शक) - 1987
- अशोक कुमार - (अभिनेता) - 1988
- लता मंगेशकर - (गायिका) - 1989
- अक्किनेनी नागेश्वर राव - (अभिनेता) - 1990
- भालचंद्र पेंढारकर - (दिग्दर्शक) - 1991
- डॉ. भुपेन हजारिका - (दिग्दर्शक) - 1992
- मजरुह सुल्तानपुरी - (गीतकार) - 1993
- दिपील कुमार - (अभिनेता) - 1994
- राजकुमार - (अभिनेता) - 1995
- शिवाजी गणेशन - (अभिनेता) - 1996
- कवि प्रदीप - (गीतकार) - 1997
- बी.आर. चोपडा - (दिग्दर्शक, सिने-निर्माता) - 1998
- ऋषिकेश मुखर्जी - (दिग्दर्शक) - 1999
- आशा भोसले - (गायिका) - 2000
- यश चोपडा - (दिग्दर्शक, सिने-निर्माता) - 2001
- देव आनंद - (दिग्दर्शक, सिने-निर्माता, अभिनेता) - 2002
मृणाल सेन - (दिग्दर्शक) - 2003 - अदूर गोपालकृष्णन - (दिग्दर्शक) - 2004
- ब्रिज भूषण चतुर्वेदी - (दिग्दर्शक) - 2005
- श्याम बेनेगल - (दिग्दर्शक) - 2006
- मन्ना डे - (गायक) - 2007
- वी. के. मूर्ती - 2008
- डी. रामा नायडू - (सिने-निर्माता) - 2009
- के. बालचंद्र - (दिग्दर्शक) - 2010
- सौमित्र चटर्जी - (अभिनेता) - 2011
- प्राण किशन शिकंद - (अभिनेता) - 2012
- गुलजार - (कवी, सिने-निर्माता) - 2013
- शशि कपूर - (अभिनेता) - 2014
- मनोज कुमार - (अभिनेता) - 2015
- कासीनाधुनी विश्वनाथ - (अभिनेता) - 2016
- विनोद खन्ना - (अभिनेता) - 2017
- अमिताभ बच्चन - (अभिनेता) - 2018
- रजनीकांत - (अभिनेता) - 2019
यंदाचा 'दादासाबेब फाळके पुरस्कार' आशा पारेख यांना जाहीर
यंदाचा 'दादासाबेब फाळके पुरस्कार' आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आशा पारेख यांनी आतापर्यंत 95 गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
संबंधित बातम्या