Amruta fadnavis New Song: "तुम्हें आईने की जरुरत नहीं"; अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज
Amruta fadnavis New Song: अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या "तुम्हें आईने की जरुरत नहीं" या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
Amruta fadnavis New Song: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचं नाव "तुम्हें आईने की जरुरत नहीं" (Tumhein Aaine Ki) असं आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
अमृता फडणवीसांचे नवे गाणे (Amruta fadnavis New Song)
"तुम्हें आईने की जरुरत नहीं" हे अमृता फडणवीसांचे नवे गाणे रिलीज झाले आहे. शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच अमृता फडणवीस यांच्यासोबतच मिट ब्रोज आणि पियुष मेहरोलिया यांनी देखील हे गाणं गायलं आहे.मिट ब्रोज यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तसेच नीलोत्पल बोरा आणि पियुष मेहरोलिया हे या गाण्याचे म्युझिक प्रोड्युसर आहेत. हे गाणे झी म्युझिक कंपनीच्या युट्यूब चॅनलवरुन शेअर करण्यात आलं आहे. गाण्याला आतापर्यंत जवळपास 2,536 व्ह्यूज मिळाले आहेत.
अमृता फडणीवस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन "तुम्हें आईने की जरुरत नहीं" या त्यांच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं,"Breezy and blissful "तुम्हें आईने की जरुरत नहीं" गाणं रिलीज झाले आहे."
View this post on Instagram
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असतात. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांना देतात. तसेच अमृता फडणवीस या सोशल मीडियावर त्यांच्या विविध लूकमधील फोटो आणि विविध गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
'मूड बना लिया' हे अमृता फडणवीस यांचे गाणी काही महिन्यांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी देखील अमृता यांनी गायली आहेत. अमृता फडणवीस यांचे वो तेरे प्यार का गम हे गाणे देखील रिलीज करण्यात आलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
VIDEO : ट्रॅफिक जॅममध्ये अमृता फडणवीसांचा 'झुमका गिरा'