VIDEO : ट्रॅफिक जॅममध्ये अमृता फडणवीसांचा 'झुमका गिरा'
Amruta Fadnavis: नुकताच अमृता फडणवीस यांनी वॉट झुमका या गाण्यावर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) या सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात. नुकताच अमृता फडणवीस यांनी वॉट झुमका (What Jhumka) या गाण्यावर एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, 'वॉट झुमका'
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधील वॉट झुमका या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. हे गाणं झुमका गिरा रे या गाण्याचं नवं व्हर्जन आहे. हे गाणं सोशल मीडियावर देखील ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्स अनेक जण इन्स्टाग्रामवर शेअर करत आहेत. अशातच आता अमृता फडणवीस यांनी वॉट झुमका या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, "ट्रॅफिक जॅममध्ये करमणूक, # झुमका"
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या ब्लॅक आऊटफिट आणि गोल्ड कलरच्या इअरिंग्स अशा लूकमध्ये दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर त्यांच्या विविध लूकमधील फोटो आणि विविध गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अमृता फडणवीस यांना इन्स्टाग्रामवर 978K फॉलोवर्स आहेत.
अमृता फडणवीस यांची गाणी
अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं असून कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांच्या 'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: